खरेदीनंतर दुकानदारांना मोबाईल नंबर सांगू नका, केंद्राचा नेमका निर्णय काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

customers will not be forced to give their mobile number and email sharing in mall and shop
customers will not be forced to give their mobile number and email sharing in mall and shop
social share
google news

Mobile number on Shopping Bill : ग्राहकांसाठी (Customer) मोठी बातमी समोर आली आहे. ग्राहकांकडून शॉपिंग (Shopping) करताना अनेकदा मोबाईल नंबर (Mobile Number) मांगितले जायचे. त्यामुळे अनेकदा ग्राहकांनी नंबर देण्याचे टाळल्यास त्यांना वस्तु देखील नाकारली जायची. या संबंधित अनेक तक्रारी केंद्रीय ग्राहक मंत्रालयाला प्राप्त झाल्या होत्या.या तक्रारीनंतर आता ग्राहकांना मोबाईल क्रमांक देण्याची सक्ती नसणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.(customers will not be forced to give their mobile number and email sharing in mall and shop)

मॉलमध्ये (Mall) अथवा एखाद्या दुकानात (Shop)तुम्ही वस्तु खरेदी करता, तेव्हा तुमच्याकडून मोबाईल नंबर मांगितला जातो. संबंधित खर्चाचे बील तुमच्या फोनवर उपलब्ध व्हावे अशा क्लुप्त्या लढवून दुकानदार तुमचे मोबाईल नंबर घ्यायचे. यामध्ये काही नागरीक थेट नंबर देऊन टाकायचे, तर काही जणांचा नंबर देण्यावरून कायम विरोध असायचा.काही घटनांमध्ये तर असे देखील समोर आले होते की, मोबाईल नंबर न दिल्यास वस्तु नाकारली जायची. त्यामुळे दुकानदारांच्या अशा वागण्याला चाप बसावी यासाठी आता ग्राहक मंत्रालयाने मोठा निर्णय़ घेतला आहे.

हे ही वाचा : Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्धाटन

देशभरातील अनेक राज्यातून ग्राहक मंत्रालयाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.या तक्रारीत ग्राहकांनी दुकानदार विनाकारण मोबाईल नंबर मांगत असल्याची तक्रार केली होती. तर काही दुकानदार मोबाईल नंबर न दिल्यास वस्तु खऱेदी करून देत नव्हते. त्यामुळे यावर आता ग्राहकांच्या बाजूने ग्राहक मंत्रालयाने मोठा निर्णय़ दिला आहे.मोबाईल नंबर देण्याची सक्ती ग्राहकांवर केली जाऊ शकत नाही. तसे केल्यास ते ग्राहक हंक्क नियमावलीचा भंग समजले जाईल. आणि संबंधित ग्राहक आणि आस्थापणावर कारवाई केली जाऊ शकते, असे केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणी केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्र आता अॅडव्हायजरी जारी करत आहेत. तसेच कोणताही विक्रेता ग्राहकांच्या मोबाईल नंबरचा आग्रह धरतो तो अयोग्य व्यापार प्रथा अतंर्गत येतो, असे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

ग्राहक मंत्रालयाच्या वतीने या संदर्भात निवेदन जारी करून स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणताही दुकानदार बिलिंग किंवा इतर कोणत्याही कामासाठी ग्राहकांकडून मोबाईल नंबर मागण्याची सक्ती करू शकत नाही. हे ग्राहक संरक्षण नियमांच्या व्यापारी धोरणाचे उल्लंघन आहे. त्यामुळे आता बिलिंग किंवा इतर कोणत्याही कामासाठी ग्राहकांना वैयक्तिक माहिती देण्याची सक्ती करणे नियमाच्या विरोधात असल्याचे सरकारने मान्य केले. या प्रकरणात मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी मागता येणार नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘घराणेशाहीत अडकलेल्यांना सावरकरांचं…’, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT