Devendra Fadnavis यांना जीवे मारण्याची धमकी, साताऱ्यातून नवलेला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांची साताऱ्यात कारवाई.
Devendra Fadnavis threat case update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांना दिली होती धमकी

point

सोशल मीडियावर व्हायरल झाला होता व्हिडीओ

point

सांताक्रूझ पोलिसांनी साताऱ्यातून जाऊन अटक

Devendra Fadnavis death threat : उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सातारा येथून एका ३४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. 

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांना ठार मारण्याची धमकी देणारे विधान असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. त्याला साताऱ्यातून अटक करण्यात आली. 

फडणवीसांना धमकी देणारा कोण?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या प्रक्षोभक भाषा करत आहे. त्याचबरोबर त्यांना ठार मारण्याची धमकी देत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. 

हे वाचलं का?

हेही वाचा >> भाजपच्या यादीत एकच मुस्लीम उमेदवार, कोण आहेत अब्दुल सलाम?

या व्यक्तीचे नाव किंचक नवले (३४ वर्ष) असे आहे. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. त्याला सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. 

शनिवारी साताऱ्यातील सदर बाजार येथे पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्याला मुंबईत आणण्यात आले. त्यांनंतर वांद्रे न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ADVERTISEMENT

योगेश सावंतच्या कोठडीत वाढ

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांच्याही कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ...अन मुकेश अंबानींच्या अश्रुंचा फुटला बांध

युवा सेनेचे अक्षय पनवेलकर यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी २९ फेब्रुवारी रोजी योगेश सावंत यांना अटक केली होती. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT