Abdul Salam : भाजपच्या यादीत एकच मुस्लीम उमेदवार, कोण आहेत अब्दुल सलाम?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

भाजपने केरळमधील एका मतदारसंघातून मुस्लीम नेत्याला उमेदवारी घोषित केली आहे.
who is bjp's muslim candidate abdul salam
social share
google news

bjp muslim candidate lok Sabha : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. जवळपास दोनशे उमेदवारांमध्ये भाजपने एकाच मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. अब्दुल सलाम यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. त्यांना केरळमधील मलप्पुरममधून तिकीट देण्यात आले आहे. (Who is Abdul Salam?)

भाजपचं सुरूवातीपासूनचं केरळवर लक्ष राहिलेलं आहे. आता पक्षाने पहिल्या यादीत कासरगोडमधून एमएल अश्विनी, कन्नूरमधून सी रघुनाथ, वडकारामधून प्रफुल्ल कृष्णा, कोझिकोडमधून एमटी रमेश, मलप्पुरममधून डॉ. अब्दुल सलाम, पोन्नानीमधून निवेदिता सुब्रमण्यन, पलक्कडमधून सी कृष्णकुमार, त्रिशूरमधून प्रसिद्ध अभिनेते सुरेश गोपी, अलाप्पुझा शोभा सुरेंद्र कडून, पथनमथिहट्टा येथील अनिल के. अँटनी, अटिंगलचे व्ही. मुरलीधरन आणि तिरुवनंतपुरमचे राजीव चंद्रशेखर यांच्या नावांची घोषणा केली आहे.  

अब्दुल सलाम कोण?

डॉ.अब्दुल सलाम हे भाजपचे सदस्य असून ते तिरूरचे आहेत. 2021 मध्ये 68 वर्षीय अब्दुल सलाम यांनी 135 मेमोम (केरळ) मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू होते. 2011 ते 2015 या काळात ते कुलगुरू होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मोदी-शाहांशी एकनिष्ठ असलेले कृपाशंकर सिंह आहेत तरी कोण?, BJP च्या पहिल्याच यादीत नाव

त्यावेळी काँग्रेसचे नियंत्रण असलेल्या यूडीएफने त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना कुलगुरू बनवत असताना शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांनी त्यांचा विरोधक केला होता. डॉ अब्दुल सलाम हे विद्यार्थी राजकारणाच्या विरोधात होते आणि त्यावर बंदी घालावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र, या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. My Neta.info नुसार त्यांची एकूण संपत्ती 6 कोटी 47 लाख रुपये आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

केरळमधील UDF मध्ये जागावाटपाबद्दल एकमत

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) ने केरळमधील लोकसभा निवडणुकीत जागावाटपाची चर्चा पूर्ण केली आहे. काँग्रेस 20 पैकी 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) 2 जागांवर (मलप्पुरम आणि पोन्नानी), एका जागेवर रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (कोल्लम) आणि केरळ काँग्रेस एका जागेवर (कोट्टायम) लढणार आहे. मुस्लिम लीगने अतिरिक्त जागेची मागणी केली होती. काँग्रेसने त्यांना राज्यसभेची जागा देण्याचे मान्य केले आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Anant ambani : ...अन मुकेश अंबानींच्या अश्रुंचा फुटला बांध

इंडिया आघाडीमध्ये असलेला सीपीआय केरळमध्ये काँग्रेसच्या विरोधात आपले उमेदवार उभे करणार आहे. सीपीआयनेही केरळमधील आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सीपीआयने वायनाडमधून राहुल गांधी आणि तिरुअनंतपुरममधून शशी थरूर यांच्याविरोधात उमेदवार जाहीर केले आहेत. सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी ॲनी राजा वायनाडमधून राहुल गांधी आणि तिरुअनंतपुरममधून पन्नियान रवींद्रन यांना आव्हान देतील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT