Ganpati Visarjan 2023: जीव मुठीत धरून गणपती बाप्पाचे विसर्जन, नेमकं काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

devotees risk their lives for ganpati bappa immersion citizens cross railway tracks to reach creek coast kalyan dombivli
devotees risk their lives for ganpati bappa immersion citizens cross railway tracks to reach creek coast kalyan dombivli
social share
google news

Ganpati Visarjan Kalyan-Dombivli: कल्याण: गणेश चतुर्थीपासून मनोभावे पूजा-अर्चा करून आज दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली शहराच्या अगदी मधोमध असलेल्या 90 फिट रोड कचोरे खंबालपाडा परिसरातील भाविकांना मात्र, अक्षरश: आपाल जीव मुठीत धरुन बाप्पाचं विसर्जन करावं लागत आहे. यंदा देखील रेल्वे रूळ ओलांडून, बाप्पा हातात घेऊन खाडी किनारी जावं लागत आहे. त्यामुळेच आता यावरून प्रशासनावर बरीच टीका होत आहे. (devotees risk their lives for ganpati bappa immersion citizens cross railway tracks to reach creek coast kalyan dombivli)

नेमकी घटना काय?

रेल्वे रुळावर कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलिसांतर्फे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, तेवढंच पुरसे नसल्याचं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे.

हे ही वाचा>> MP Election: ‘मोदी म्हणजे गॅरंटी…’, पंतप्रधानांना असं का बोलावं लागलं?, म्हणजे…

कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नाही, या भागात तलाव नसल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून गणेश घाटावर जावे लागते. या भागातील ग्रामदेवतेचे मंदिर देखील खाडी किनाऱ्यालगत रुळापलीकडे आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे गणपती बाप्पाला देखील आपला परतीचा प्रवास करताना रेल्वे रूळ ओलांडावे लागत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. दरम्यान, रेल्वे रुळांवरील हा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी या परिसरात कृत्रिम तलाव बनविण्याची तसेच याठिकाणी जाण्यासाठी पुश थ्रू बोगदा बनविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत गेल्या पाच वर्षापासून पालिका प्रशासनाकडे तलाव बांधण्यासाठी तसेच रेल्वे प्रशासनाकडे बोगदा बनविण्यासाठी पाठपुरावा नागरिक करीत आहेत.

हे ही वाचा>> Pune : ‘मुलाचं निधन झालंय, डीजे वाजवू नका’, 21 जणांनी अवघ्या कुटुंबाला केली बेदम मारहाण

5 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यंदा पालिकेने विसर्जनासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे. मात्र ही व्यवस्था अपुरी असल्याने भाविक खाडी किनारीच गणपती विसर्जन करीत आहेत. मागील अनेक वर्षांपासून ट्रॅक क्रॉस करून, जीव मुठीत धरून गणपतीचे विसर्जन केले जात आहे. इथे हजारोंच्या संख्येने भाविक येतात. बोगदा बनण्यासाठी रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे. मात्र, अद्याप तरी प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई झालेलीच नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT