Dombivali Blast : डोंबिवली हादरली! बॉयलरच्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू, 25 ते 30 कामगार गंभीर जखमी

मिथिलेश गुप्ता

Dombivali MIDC Blast : एमआयडीसीच्या फेज 2 मधील अमोधन नावाच्या केमिकल कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे. कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट इतका भयानक होता, सर्वत्र आगीचे लोण पसरले आहे. या स्फोटाच्या आणि आगीच्या झळा आजूबाजूच्या कंपन्या आणि कामगारांना बसला आहे.

ADVERTISEMENT

डोंबिवलीच्या एमआयडीसीत बॉयलरचा भीषण स्फोट
dombivali chemical company midc blast boiler blast shockinh story dombivali
social share
google news

Dombivali MIDC Blast : डोंबिवलीच्या एमआयडीसीत भीषण स्फोटाची घडना घडली आहे. या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 64 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या जखमी कामगारांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, कंपनीच्या नजीकच्या अनेक इमारतीच्या काचा फुटल्या आहेत आणि परिसरात काळ्याकुट्ट धुरांचे लोण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. (dombivali chemical company midc blast boiler blast shocking story dombivali) 

डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान या हार्डनर बनवणाऱ्या कंपनीतील रिॲक्टरचा आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. हा स्फोट इतका भयानक होता की त्यामुळे शेजारील कंपन्या, दुकाने आणि रहिवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले. शेजारील कंपन्यांमध्ये आग पसरून तर स्फोटामुळे अनेक दुकानांच्या आणि रहिवासी इमारतीमधील घरांच्या काचा फुटल्या. यातील जखमींवर एम्स आणि नेपच्युन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाही.

हे ही वाचा : Maharashtra News : यमाची पडली वक्रदृष्टी; महाराष्ट्रात 20 जणांचा बुडून मृत्यू!

आजचा स्फोट हा साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. तर त्यापेक्षा लांब दूरवरून या स्फोटानंतर लागलेल्या आगीचे - धुराचे लोळ आकाशात उठल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्यामध्ये आतापर्यंत आगीमध्ये जळालेल्या 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. तर केडीएमसी अग्निशमन दलासोबतच एनडीआरएफची एक टीम आणि औद्योगीक सुरक्षा विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp