TESLA : PM मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतल्यानंतर एलन मस्क यांची मोठी घोषणा
एलन मस्क यांनी सांगितले की, “कंपनी नजीकच्या काळात भारतात गुंतवणूक करणार आहे, जी भारताच्या विकासासाठी महत्त्वाची ठरेल.”
ADVERTISEMENT

Elon Musk Narendra Modi meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून मंगळवारी (20 जून) त्यांनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी असलेल्या टेस्लाच्या भारतात येण्याबद्दलही चर्चा झाली. बैठकीनंतर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या भारतात येण्याबद्दल मोठं विधान केलं. न्यूयॉर्कमधील पॅलेस हॉटेलमध्ये एलन मस्क यांनी सांगितले की, “कंपनी नजीकच्या काळात भारतात गुंतवणूक करणार आहे, जी भारताच्या विकासासाठी महत्त्वाची ठरेल.”
एलन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर भारतात गुंतवणूक करण्याच्या योजनेला दुजोरा देताना सांगितले की, मी स्वत: पुढच्या वर्षी भारत भेटीवर येण्याचा कार्यक्रम तयार करत आहे आणि टेस्लाही भारतात पाऊल ठेवेल असा विश्वास आहे. मस्क म्हणाले की, “पंतप्रधानांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो आणि आशा करतो की नजीकच्या भविष्यात आम्ही काहीतरी जाहीर करू. भारतासोबत असलेल्या आमच्या संबंधांच्या दृष्टिने ही एक महत्त्वाची गुंतवणूक असेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केलं कौतुक
एलन मस्क यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना म्हटले की, “त्यांना भारताची खरोखर काळजी आहे. मी मोदींचा चाहता आहे.” टेस्लाचे सीईओ मस्क यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत पंतप्रधान मोदींनीही ट्विट केले.
हेही वाचा >> Lok Sabha : भाजपचं मिशन-80 काय?; खासदारांना फॉर्ममधून द्यावा लागणार हिशोब
“आज तुमच्यासोबतची भेट खूप छान होती.” यावर इलन मस्क यांनी पीएम मोदींशी संवाद साधल्यानंतर सांगितले की, “तुम्हाला पुन्हा भेटणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे.”