‘कफ सिरप’बाबत रुग्णालयांना सरकारचं पत्र, 'त्या' पत्रात नेमकं काय?
‘कफ सिरप’च्या उपयोगासंदर्भात भारत सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करण्यासाठी नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांसाठी पत्र जारी केलं आहे.
ADVERTISEMENT

नागपूर: भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे लहान मुलांना ‘कफ सिरप’ च्या युक्ती संगत वापराबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशानिर्देशाचे पालन करण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागपूर शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना पत्र दिले आहे.
दूषित ‘कफ सिरप’ मुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्यानंतर भारत सरकारने यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले. या दिशानिर्देशाचे शहरात पालन व्हावे यादृष्टीने मनपा आरोग्य विभागातर्फे रुग्णालयांना सूचना देण्यात आली आहे.
हे ही वाचा>> कोल्ड्रिफ सिरपच्या विषबाधेमुळे किडनीसह आता मेंदूला सूज, राज्यसरकारचा विक्रीबाबत मोठा निर्णय
महापालिकेने कोणते आदेश केले जारी?
सद्यस्थितीत नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये 0 ते 16 वर्ष वयोगटातील संशयित मेंदूज्वराचे (एइएस) एकूण 12 रुग्ण आहेत. यातील मध्यप्रदेशातील 10 व महाराष्ट्रातील 1 आणि तेलंगणाचा 1 रुग्ण आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये 6 रुग्ण उपचार घेत आहेत. एम्समध्ये 2 रुग्ण, न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये 1 रुग्ण, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 1 रुग्ण, कलर्स हॉस्पिटलमध्ये 1 आणि गेट वेल हॉस्पिटल 1 रुग्ण उपचार घेत आहेत.
हे ही वाचा>> MMBC च्या विद्यार्थीला मित्राने गोड बोलून सोबत नेलं, ड्रिंकमधून नशेचं औषध दिलं अन् कित्येक दिवस..
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार, ‘लहान मुलांमध्ये खोकल्याचे आजार हे स्वतःहून बरे होतात, अनेकदा ते औषधाशिवाय बरे होतात. यासाठी पुरेसा आराम आणि जास्त पाणी पिल्यामुळे व इतर गैरऔषधी उपाययोजना हे प्रथमोपचार पुरेसे असते. त्यामुळे 2 वर्षाखालील मुलांना सर्दी व खोकल्याकरिता औषध देणे टाळावे. 5 वर्षावरील मुलांना आवश्यकता असल्यास काळजीपूर्वक वैद्यकीय सल्ल्यानुसार व देखरेखीतच योग्य डोसमध्ये औषध द्यावी. बहुऔषधांचे संयोजन टाळावे. वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषध घेण्याचे आवाहन देखील भारत सरकारने जनतेला स्थानिक संस्थेद्वारे केले आहे.’