MMBC च्या विद्यार्थीला मित्राने गोड बोलून सोबत नेलं, ड्रिंकमधून नशेचं औषध दिलं अन् कित्येक दिवस..
Crime News : MMBC च्या विद्यार्थीला मित्राने गोड बोलून सोबत नेलं, ड्रिंकमधून नशेचं औषध दिलं अन् कित्येक दिवस केले अत्याचार
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

MMBC च्या विद्यार्थीला मित्राने गोड बोलून सोबत नेलं

ड्रिंकमधून नशेचं औषध दिलं अन् कित्येक दिवस केले अत्याचार
Crime News : देशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांनी समाजाच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांतही महिलांच्या सुरक्षेचा अभाव स्पष्टपणे जाणवतोय. दिल्लीतील एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील आदर्श नगर परिसरातील एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने आपल्या मित्रावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेचं म्हणणं आहे की, आरोपीने तिला हॉटेलमध्ये बोलावलं, तिला नशेचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नव्हे तर त्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही काढले.
हॉटेलमध्ये नशा देऊन केलेलं कृत्य
अधिकची माहिती अशी की, एमबीबीएस विद्यार्थीनी 9 सप्टेंबर रोजी तिच्या मित्राच्या जाळ्यात अडकली. ती मूळची हरियाणातील जींद जिल्ह्यातील असून दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहात राहून शिक्षण घेत आहे. तर 20 वर्षीय आरोपी अमनप्रीत हा देखील जींद जिल्ह्यातील असून दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. दोघेही एकाच परिसरातील असल्याने पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला.
महिनाभर ब्लॅकमेल करून अत्याचार सुरूच ठेवले
आरोपीने पार्टीच्या बहाण्याने पीडितेला आदर्श नगरमधील हॉटेल अॅपल येथे बोलावले. तेथे त्याचे दोन मित्रही उपस्थित होते. पीडिता हॉटेलमध्ये पोहोचताच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिसळलं. नशेमुळे ती बेशुद्ध झाली आणि आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ घेतले.