'तु लडका है या लडकी?' विचारत तरुणीचा विनयभंग, नंतर बेदम मारहाण...उल्हासनगरातील लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

Ulhasnagar news : उल्हासनगरमध्ये मानवतेला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका तरुणीचा विनयभंग करुन तिच्या कटुंबीयांना मारहाण करण्यात आल्याची घटना आहे.

ADVERTISEMENT

ulhasnagar news
ulhasnagar news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'तु लडका है या लडकी?' तरुणाच्या प्रश्नावरून वादंग 

point

घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar news : उल्हासनगरमध्ये मानवतेला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका तरुणीचा विनयभंग करुन तिच्या कटुंबीयांना मारहाण करण्यात आल्याची घटना आहे. विशेष म्हणजे या प्रकराबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनीही आरोपीने मारहाण केली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

हे ही वाचा : जालन्यात 13 वर्षीय शाळकरी मुलीने उचललं टोकाचं पाऊल, शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

'तु लडका है या लडकी?' तरुणाच्या प्रश्नावरून वादंग 

मिळालेल्या एकूण माहितीनुसार, ही घटना कॅम्प क्रमांक 1 परिसरात घडली आहे. संबंधित तरुणी रस्त्यावरून जाताना अंश करोतीया या तरुणाने तिला 'तु लडका है या लडकी?' असे विचारत तिची खिल्ली उडवून तिला अपमानित केले. त्यानंतर त्याने विनयभंग करत तिच्यावर हात उगारून तिला मारहाण केली. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी तरुणीचे कुटुंबीय तरुणाच्या घरी गेले असता, तरुण अंश करोतीया आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना मारहाण केली. 

घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

या हल्ल्यात कुटुंबीय गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. या मारहाणीची एकूण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत उल्हासनगर पोलीस ठाण्यात अंश करोतीया विरोधात विनयभंग, मारहाण आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

हे ही वाचा : चंद्रपूर हादरलं! हॉस्टेलमध्ये मानसिक त्रास, अखेर 17 वर्षाच्या तरुणाने दोर आवळत संपवलं जीवन, 'त्या' चौघांचं नाव समोर

दरम्यान, राज्यात महिलांवरील अन्याय आणि अत्याचारासह विनयभंगाच्या अनेक घटना घडत आहेत. या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. आपण 21 व्या शतकात राहत असून असे प्रकार घडत असतील तर ही एक लज्जास्पद बाब आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp