Manohar joshi : शिवसेनेचे 'जोशी सर' गेले! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Manohar Joshi's condition is critical, Hinduja Hospital gives health update
मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक, हिंदुजा रूग्णालयाने दिली हेल्थ अपडेट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सुरु होते उपचार

point

ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

point

मनोहर जोशी यांचे निधन

Manohar Joshi Latest News : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. (Manohar Joshi, Ex chief minister of Maharashtra passed away)

ADVERTISEMENT

मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील हिंदुजा रुग्णालय दाखल करण्यात आले होते.

हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे निदान झाले. त्यानंतर मनोहर जोशी यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते.

हे वाचलं का?

तत्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3.02 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दुपारी अंत्यसंस्कार

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर जोशी यांचं पार्थिव सकाळी नऊ वाजता रुग्णालयातून घरी नेण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पश्चिम माटुंगा येथील रूपारेल कॉलेज जवळील W54 निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. दादर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महापौर ते लोकसभा अध्यक्ष, भूषवली अनेक पदे

मनोहर जोशी यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक पदांवर काम केले होते. ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते विधानसभेचे आमदार राहिले,  विधान परिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी काम केले. पुढे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्याची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना संसदेत पाठवले. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून काम केले. तसेच ते लोकसभेचे अध्यक्षही राहिले आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT