‘दादा’ म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या, मी म्हणाले देणार नाही; मीरा बोरवणकरांचा गौप्यस्फोट

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Meera borwankar Revealed about how pune's guardian minister pressurized her for hand over land to builder.
Meera borwankar Revealed about how pune's guardian minister pressurized her for hand over land to builder.
social share
google news

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरणवणकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे. मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर पुस्तकात केलेल्या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा रंगू लागली आहे. ‘पुण्यातील पोलिसांच्या जागेचा लिलाव पालकमंत्र्यांनी केला. जमीन हस्तांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात मला त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं. पण, मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकारला’, असं बोरवणकरांनी म्हटलं आहे. पुस्तकात बोरवणकरांनी त्यावेळच्या पालकमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही, पण ‘दादा’ असा उल्लेख केलेला आहे.

मीरा बोरवणकरांनी काय म्हटलंय?

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात म्हटलं आहे की, “पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटलं. त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटा. याचवेळी विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील असल्याचंही त्यांनी मला सांगितलं.”

व्हिडीओ >> ‘जरांगे कुणाचं खातोय ते सांगावं’, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर पलटवार

“विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी मला सांगितलं की, या जागेचा लिलाव झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्यासोबत मी (मीरा बोरवणकर) जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी.”

“मी पालकमंत्र्यांना सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही. शिवाय कार्यालयं आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज असल्याचं मी त्यांना सांगितलं”, असं बोरवणकरांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Hardik Pandya, Ind vs Pak: ‘मी स्वत:लाच शिवी दिली’, हार्दिक काय म्हणाला?

“मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. पण, त्या मंत्र्याने माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला”, असं बोरवणकरांनी पुस्तकात म्हटलं आहे.

मीरा बोरणकरांच्या आरोपातील पालकमंत्री दादा कोण?

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात त्या पालकमंत्र्याचं थेट नाव घेतलेले नाही. पण, बोरणवणकरांचा रोख अजित पवारांच्या दिशेने असल्याचे दिसत आहे. कारण मीरा बोरवणकरांनी जुलै २०१० मध्ये पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे होते. पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी केलेल्या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झालीये. दुसरीकडे अजित पवारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT