गडचिरोली: प्रेमविवाह ते निर्दयी हत्या; दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं, एका महिन्यानंतर मृत्यू! दोन मुलं अनाथ...
डचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावात पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. पत्नीने दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागात पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळून निर्घृण हत्या
गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Gadchiroli Crime: गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावात पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. पत्नीने दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागात पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याचं वृत्त आहे. पीडित महिलेवर जवळपास एक महिन्यापासून उपचार सुरू होते, पण शेवटी नागपूर रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तसेच, पीडितेचा आरोपी पतीसोबत प्रेमविवाह झाला होता.
दारूच्या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव प्रियंका सुशील बारसागडे असून 2018 मध्ये तिने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन सुशीलसोबत प्रेमविवाह केला होता. सुशील मजूरी करून आपलं घर चालवत होता. लग्नानंतर काही वर्षे दोघांचा सुखाचा संसार सुरू होता. पण, दारूच्या व्यसनामुळे त्यांचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला. सुशील दारूसाठी सतत प्रियंकाकडे पैसे मागायचा आणि दारूच्या नशेत तिला मारहाण देखील करायचा.
हे ही वाचा: बिर्यानीतून नवऱ्याला नशायुक्त पदार्थ दिला, प्रियकराच्या मदतीने तोंड दाबून संपवलं मृतदेहाजवळ अश्लील व्हिडीओ पाहिले
पेट्रोल ओतून पत्नीला जाळलं...
16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी जवळपास 5 वाजताच्या सुमारास सुशीलने दारूसाठी आपल्या पत्नीकडे पैशांची मागणी केली. प्रियंकाने पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यानंतर आरोपी पतीने तिला बेदम मारहाण केली आणि कपाटातून 2000 रुपये घेऊन तो घरातून निघून गेला. काही वेळानंतर, तो पुन्हा घरी परत आला. त्यावेळी प्रियंका स्वयंपाकघरात काम करत असताना त्याने मागून तिच्यावर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. प्रियांकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची 5 वर्षांची मुलगी सुप्रिया सुद्धा जोरजोरात रडू लागली आणि शेजारचे लोक घटनास्थळी धावले. तोपर्यंत प्रियांकाचं शरीर ते 40 ते 500 टक्के भाजलं होतं. दरम्यान, आरोपी पतीने पकडलं जाऊ नये म्हणून चादरीने आग विझवण्याचं नाटक केलं.
हे ही वाचा: उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरने स्वत:च्या काका-काकीला भूलीचे हाय डोस देऊन संपवलं, 24 तासात झाला उलगडा
उपचारादरम्यान, पीडितेचा मृत्यू
या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या प्रियंकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आण त्यानंतर तिला नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केलं. मात्र, 20 जानेवारी रोजी तिची प्रकृती खालावल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आता, पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, गडचिरोली पोलिसांनी आरोपी सुशील चिंटूजी बारसागडे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे दोन निष्पाप मुलांवरून आईचं छत्र हरपलं. परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.










