उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरने स्वत:च्या काका-काकीला भूलीचे हाय डोस देऊन संपवलं, 24 तासात झाला उलगडा

मुंबई तक

doctor kills uncle aunt anaesthesia : ही घटना भद्रावतीतील भूतानागुडी परिसरातील आहे. येथे राहणारे 75 वर्षीय चंद्रप्पा आणि त्यांची 65 वर्षीय पत्नी जयम्मा हे दाम्पत्य घरात मृतावस्थेत आढळले. चंद्रप्पा हे VISL मधून निवृत्त कर्मचारी होते. दाम्पत्याला तीन मुलगे असून ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. 20 जानेवारी रोजी मृत्यूची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली. प्रकरणाची नोंद ओल्ड टाउन पोलीस ठाण्यात करण्यात आली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरने स्वत:च्या काका-काकीला भूलीचे हाय डोस देऊन संपवलं,

point

24 तासात झाला उलगडा

doctor kills uncle aunt anaesthesia : इलाजावर करणाऱ्या डॉक्टरवर विश्वास होता आणि रक्ताच्या नात्यावरही ठाम भरोसा होता. मात्र हाच विश्वास एका वृद्ध दाम्पत्याच्या जीवावर बेतला. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना केवळ दुहेरी हत्येची नाही, तर विश्वासघाताचीही आहे. अनोळखी व्यक्तीने नव्हे, तर कुटुंबातीलच डॉक्टर असलेल्या नातलगाने उपचाराच्या नावाखाली भूलिचे इंजेक्शन देत काका-काकीचा जीव घेतल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या दुहेरी हत्येचा उलगडा केलाय. संशयाची सुई थेट नातलगाकडे वळली. चौकशीनंतर समोर आलेलं सत्य हादरवून टाकणारं होतं. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला डॉक्टरने काका-काकींच्या सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेतून हे भीषण कटकारस्थान रचलं. शिवमोगा पोलिसांच्या जलद कारवाईमुळे या खुनामागचा काळा अध्याय उघडकीस आला.

ही घटना भद्रावतीतील भूतानागुडी परिसरातील आहे. येथे राहणारे 75 वर्षीय चंद्रप्पा आणि त्यांची 65 वर्षीय पत्नी जयम्मा हे दाम्पत्य घरात मृतावस्थेत आढळले. चंद्रप्पा हे VISL मधून निवृत्त कर्मचारी होते. दाम्पत्याला तीन मुलगे असून ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. 20 जानेवारी रोजी मृत्यूची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली. प्रकरणाची नोंद ओल्ड टाउन पोलीस ठाण्यात करण्यात आली.

नातलगच कसा ठरला मारेकरी?

पोलिस तपासात आरोपी कोण दुसरा नसून चंद्रप्पा यांचा भाचा असल्याचं निष्पन्न झालं. आरोपीची ओळख 44 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टर जी. पी. मल्लेश अशी आहे. मल्लेशवर मोठ्या प्रमाणात कर्ज होतं. त्याने काकाकडे आर्थिक मदत मागितली होती; मात्र मदत न मिळाल्याने राग आणि लालसा यांची सरमिसळ होऊन तो गुन्ह्याच्या मार्गावर गेला. पोलिसांच्या मते, घरातील मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणं हा त्यामागचा मुख्य हेतू होता.

मृत्यूचं इंजेक्शन कसं देण्यात आलं?

19 जानेवारी दुपारी मल्लेश काका-काकींच्या घरी गेला. तब्येतीची चौकशी करताना त्यांच्या नसांच्या आजारावर व्हॅरिकोज वेन्स उपचाराची ऑफर दिली. विश्वास संपादन करून त्याने जनरल अ‍ॅनेस्थेसिया ‘प्रोपोफोल’चा अतिप्रमाणात डोस दिला. सामान्यतः शस्त्रक्रियेत याची मात्रा 1 ते 2 मिलीग्रॅम असते; मात्र आरोपीने दोघांनाही सुमारे 50 मिलीग्रॅम इंजेक्शन दिलं. या हाय डोसमुळे काही वेळातच दोघांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp