बिर्यानीतून नवऱ्याला नशायुक्त पदार्थ दिला, प्रियकराच्या मदतीने तोंड दाबून संपवलं मृतदेहाजवळ अश्लील व्हिडीओ पाहिले
Crime News : ही घटना गुंटूर जिल्ह्यातील चिलुवुरू गावातील आहे. आरोपी महिलेचे नाव लक्ष्मी माधुरी असून मृत पती लोकम शिवा नागराजू हा कांदा व्यापारी होता. पोलिसांच्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होते. याच काळात माधुरीचे गोपी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. घटनेच्या दिवशी माधुरीने पतीसाठी बिर्याणी तयार केली होती
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बिर्यानीतून नवऱ्याला नशायुक्त पदार्थ दिला
प्रियकराच्या मदतीने तोंड दाबून संपवलं मृतदेहाजवळ अश्लील व्हिडीओ पाहिले
Crime News : नातेसंबंधांच्या आड लपलेली कटकारस्थाने जेव्हा उघडकीस येतात, तेव्हा अंगावर काटा उभा राहतो. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून समोर आलेले हे प्रकरण त्याचेच भयावह उदाहरण आहे. येथे एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आधी जेवणात (बिर्यानी) नशेचे औषध मिसळून पतीला बेशुद्ध करण्यात आले आणि नंतर झोपेत असताना उशीने तोंड दाबून त्याचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना केवळ एका हत्येपुरती मर्यादित नसून, मानसिक विकृती आणि तुटलेल्या नात्यांतील विश्वासघाताचे भयावह चित्र दाखवणारी आहे. हत्येनंतर पत्नीने संपूर्ण रात्र पतीच्या मृतदेहाजवळ बसून अश्लील चित्रपट पाहिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. सकाळी मात्र तिने पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
संशयातून उघडकीस आलेले सत्य
ही घटना गुंटूर जिल्ह्यातील चिलुवुरू गावातील आहे. आरोपी महिलेचे नाव लक्ष्मी माधुरी असून मृत पती लोकम शिवा नागराजू हा कांदा व्यापारी होता. पोलिसांच्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होते. याच काळात माधुरीचे गोपी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. घटनेच्या दिवशी माधुरीने पतीसाठी बिर्याणी तयार केली होती. या जेवणात नशेचे औषध मिसळल्याचा संशय आहे. जेवण केल्यानंतर नागराजू गाढ झोपेत गेला. रात्री साडेअकराच्या सुमारास माधुरीचा प्रियकर गोपी घरात आला. त्यानंतर दोघांनी मिळून हत्या करण्याची योजना अंमलात आणली.
हेही वाचा : 'मी तुळजापूरला नवस फेडायला गेले होते..', मोबाईल बंद कशामुळे होता? सरिता म्हस्केंनी घडलेलं सगळं सांगितलं
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गोपीने नागराजूच्या छातीवर बसून त्याला आवळून धरले, तर माधुरीने उशीने पतीचा गळा दाबला. काही वेळातच नागराजूचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर गोपी तेथून निघून गेला आणि माधुरी एकटीच घरात राहिली. यानंतर घडलेला प्रकार अधिकच संतापजनक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संपूर्ण रात्र ती घरातच राहिली आणि मृत पतीच्या जवळ बसून अश्लील व्हिडीओ पाहत राहिल्याचा आरोप आहे. पहाटे सुमारे चार वाजता तिने शेजाऱ्यांना पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले.










