Ganesh Visarjan 2024: बाप्पाच्या विसर्जनापूर्वी 'या' राशीच्या लोकांनी करा विशेष पूजा! सर्व विघ्न होतील दूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाप्पाच्या विसर्जनापूर्वी 'या' राशीच्या लोकांनी करा विशेष पूजा

point

बाप्पाचे आज (17 सप्टेंबर) ताशांच्या गजरात विसर्जन होणार

point

गणेश विसर्जनापूर्वी राशीनुसार करा 'हे' उपाय

Ganesh Visarjan 2024 : यावर्षी गणेश चतुर्थीचा मुहूर्त 7 सप्टेंबर 2024 रोजी होता. आता 10 दिवसांनी बाप्पा सर्वांचा निरोप घेणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या या शुभ मुहूर्तावर बाप्पाचे आज (17 सप्टेंबर) थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात विसर्जन होणार आहे. हे दहा दिवस खूप शुभ आणि समृद्ध मानले जातात. असे मानले जाते की या काळात गणपतीशी संबंधित काही विशेष उपाय केल्याने प्रत्येक विघ्न दूर होतात आणि श्रीगणेशाची विशेष कृपा राहते. शास्त्रात गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत राशीनुसार उपाय करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. चला मग जाणून घेऊया राशीनुसार कोणते उपाय केले पाहिजेत. (Ganesha Visarjan 2024 Astrological methods for performing puja by Zodiac before ganesh visarjan)

हेही वाचा : Maharashtra Weather: बाप्पाच्या विसर्जनाला आज राज्यात पावसाचा अंदाज काय? वाचा IMD रिपोर्ट

गणेश विसर्जनापूर्वी राशीनुसार करा 'हे' उपाय

मेष - मेष राशीच्या लोकांनी बाप्पासोबत सुपारीची पूजा करावी आणि ही सुपारी कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावी. यामुळे तुमच्या संपत्तीत भरभराट होईल आणि बाप्पाचा विशेष आशीर्वाद मिळेल.

वृषभ - तुम्ही गणपतीला हार घालून चार नारळ अर्पण करू शकता. असे केल्याने कामाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी व्रताच्या वेळी 'गणेश संकट नाशक स्तोत्र' पाठ करा. यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.

कर्क - कर्क राशीचे लोक श्रीगणेशाला पंचमेवा अर्पण करू शकतात. यामुळे तुमचे ग्रह दोष दूर होतील.

ADVERTISEMENT

सिंह - मुलांच्या प्रगती किंवा शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी सिंदूर अर्पण करावा. तसेच गणेश स्तोत्राचे पठण करावे.

ADVERTISEMENT

कन्या - लोकांनी या दिवशी गायीची सेवा अवश्य करावी. तसेच, गणपतीचे वाहन असलेल्या उंदराला काही अन्न दिले पाहिजे. असे केल्याने श्रीगणेशाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो.

हेही वाचा : Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा? तर काही व्यक्तींची लव्ह लाईफ...

तूळ - घरामध्ये दररोज संकट येत असेल तर गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज 108 वेळा 'ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं' या मंत्राचा जप करावा.

वृश्चिक - पैशाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी मातीच्या बाप्पाची मूर्ती बसवा आणि रोज आरती करा. असे 10 दिवस केल्याने सर्व समस्या दूर होतात.

धनु - नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करायची असेल तर घरात पिवळ्या रंगाची गणेशमूर्ती स्थापित करा.

मकर - मकर राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला 11 गठ्ठी दुर्वा अर्पण कराव्यात. यासोबतच प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की यामुळे प्रगती दुप्पट होते.

कुंभ - या दिवशी बाप्पाची पूजा केल्यानंतर गाईला तूप आणि गूळ खाऊ घाला. तसेच तुमच्या इच्छेनुसार गरीब आणि गरजूंना दान करा. यामुळे ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होतो.

मीन - मीन राशीच्या लोकांसाठी गणेश यंत्र हे अत्यंत चमत्कारी साधन मानले जाते. हे यंत्र घरामध्ये स्थापित केल्यास तेथील नकारात्मक शक्ती दूर होतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT