Maharashtra Weather: बाप्पाच्या विसर्जनाला आज राज्यात पावसाचा अंदाज काय? वाचा IMD रिपोर्ट
Mumbai Weather Forecast Today : गणपती बाप्पाच्या आगमनाला राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला होता. अशावेळी आज अनंत चतुर्दशी... त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाला तुमच्या शहरात पावसाचा अंदाज कसा असेल जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बाप्पाच्या विसर्जनाला आज राज्यात पावसाचा अंदाज काय?
मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Forecast on Ganesh Visarjan 2024 : गणपती बाप्पाच्या आगमनाला राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला होता. अशावेळी आज अनंत चतुर्दशी... त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाला तुमच्या शहरात पावसाचा अंदाज कसा असेल जाणून घेऊयात. पाऊस परतणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश याठिकाणी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाने पुन्हा जोर धरल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (maharashtra Weather Forecast on Ganesh Visarjan 2024 mumbai pune rain update news today 17 September 2024)
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. आकाश अंशत: ढगाळ राहील असे हवामान खात्याने म्हटलं आहे. मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २४°C च्या आसपास असेल.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?
कोकणात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुणे शहर परिसरात आभाळ ढगाळ असेल, अधूनमधून हलका पाऊस पडू शकतो. तर, घाट विभागातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुण्याचे तापमान आज 27°C कमाल आणि 20°C किमान इतके असू शकते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा? तर काही व्यक्तींची लव्ह लाईफ...
मराठवाड्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भात हलक्यात ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT