मुंबईकरांनो तुम्हाला 'इथे' करायचंय मतदान, पाहा मुंबईतील प्रत्येक मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी
BMC Polling Booths: मुंबईतील 227 प्रभागांसाठी उद्या (15 जानेवारी 2026) मतदान होणार आहे. पाहा मुंबईतील मतदान केंद्रांची नेमकी यादी.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईकरांनो, उद्या 15 जानेवारी 2026 हा दिवस ऐतिहासिक आहे! तब्बल 4 वर्षानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या 227 प्रभागांसाठी मतदान होत आहे. शहरात एकूण सुमारे 10,231 मतदान केंद्रे (पोलिंग स्टेशन्स) उभारण्यात आली आहेत, ज्यात सरकारी इमारती, सहकारी सोसायट्या आणि खासगी जागांचा समावेश आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत चालणार आहे. उद्या सार्वजनिक सुट्टी असल्याने जास्तीत जास्त मुंबईकर मतदानासाठी बाहेर पडतील, असा अंदाज आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीचा मुख्य तपशील:
- मतदानाची तारीख: 15 जानेवारी 2026 (गुरुवार)
- मतदानाची वेळ: सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत
- मतमोजणी आणि निकाल: 16 जानेवारी 2026 (शुक्रवार) रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल, दिवसअखेर निकाल अपेक्षित
- मतदारांची संख्या: मुंबईत सुमारे 1.03 कोटी मतदार
- मुंबईतील एकूण प्रभाग: 227
हे ही वाचा >> मुंबईतील 227 वॉर्डातील उमेदवारांची संपूर्ण यादी, मतदानाला जाण्याआधी नक्की पाहून जा!
मतदान केंद्र: सुमारे १०,०००+ केंद्रे मुंबईत उभारली आहेत (सरकारी इमारती, सोसायट्या, खासगी जागा).
पाहा तुम्हाला नेमकं कुठे मतदान करायचं आहे
मुंबईतील मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी पाहाण्यासाठी >> View PDF यावर क्लिक करा
हे ही वाचा >> ठाकरे गड राखणार की महायुती बाजी मारणार? BMC साठी उद्या मतदान, 'इतके' सुरक्षारक्षक तैनात
प्रमुख राजकीय लढत:
ही निवडणूक मुख्यतः महायुती (भाजप + शिंदे गट शिवसेना + अजित पवार गट NCP) आणि महाविकास आघाडी (शिवसेना उद्धव ठाकरे गट + मनसे + राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) यांच्यातील आहे. मतदानासाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मुंबईकर मतदान करू शकतील.










