Ganpati Visarjan 2024: गणपती विसर्जनाला विशेष लोकल सेवा, एका क्लिकवर पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई तक

ADVERTISEMENT

ganpati visarjan 2024 central railway running specical local train anant chaturdashi 2024 mumbai local ganapati festival
गणपती विसर्जनाला विशेष लोकल सेवा चालवणार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनंत चतुदर्शीला विशेष लोकल सेवा

point

गणेशभक्तांना विसर्जनाचा आनंद घेता येणार

point

कसं असणार रेल्वेचं वेळापत्रक

Ganpati Visarjan 2024 Special Local Train : येत्या 17 तारखेला अनंत चतुदर्शी आहे. या दिवशी गणेशभक्त बाप्पांचा शेवटचा निरोप घेणार आहेत.त्यामुळे भक्तांची आणि बाप्पांची ताटातूट टाळण्यासाठी विशेष लोकलसेवा चालवण्यात येणार आहे. या गाड्या सीएसएमटी ते कल्याण आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल अशा चालविण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने एक्स वर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाला नेमकं लोकलचं वेळापत्रक कसं असणार आहे? हे जाणून घेऊयात. (ganpati visarjan 2024 central railway running specical local train anant chaturdashi 2024 mumbai local ganapati festival) 

ADVERTISEMENT

सीएसएमटी ते कल्याण विशेष लोकलचे वेळापत्रक 15 ते 17 सप्टेंबर

मेन लाईन डाऊन मार्गावर 

सीएसएमटी ते कल्याण विशेष लोकल  रात्री 1.30 वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटेल आणि ती कल्याणला 3.10 वाजता कल्याणला पोहोचेल
सीएसएमटी ते ठाणे विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि ठाण्याला 3.30 वाजता पोहोचेल.
सीएसएमटी ते कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री 3.25 वाजता सुटेल आणि कल्याणला 4.55 वाजता पोहोचेल.

हे ही वाचा : पोलीस महिलेला फुटला मातृत्वाचा पाझर! बाळाला पाजलं अंगावरचं दूध, पण तपासातून समोर आली भयंकर माहिती

मेन लाईन अप मार्गावर 15 ते 17 सप्टेंबर

कल्याण ते सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री 00.05 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री 1.30 वाजता पोहोचेल.
ठाणे ते सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री 01.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री 02.00 वाजता पोहोचेल.

हे वाचलं का?

ठाणे ते सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री 02.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री 03.00 वाजता पोहोचेल.
कल्याण ते सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून पहाटे 05.06 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 05.32 वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन डाऊन मार्गावर  17,18 सप्टेंबर

सीएसएमटी ते पनवेल विशेष लोकल रात्री सीएसएमटीहून 1.30 वाजता सुटेल आणि पनवेलला रात्री 2.30 वाजता पोहोचेल.
सीएसएमटी ते पनवेल विशेष लोकल रात्री सीएसएमटीहून 2.45 वाजता सुटेल आणि पनवेलला पहाटे 04.05 वाजता पोहोचेल.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Big Boss Marathi 5: '... जसं दिसतं तसं नसतं'; आर्याच्या 'त्या' स्टोरीतून नेमके कोणते संकेत?

हार्बर लाईन अप मार्गावर 17,18 सप्टेंबर

पनवेल ते सीएसएमटी विशेष लोकल रात्री पनवेलहून 01.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री 02.20 वाजता पोहोचेल.
पनवेल ते सीएसएमटी विशेष लोकल रात्री पनवेलहून 01.45 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री 03.05 वाजता पोहोचेल.

ADVERTISEMENT

15, 16, 17,18 या दिवशी गणपतीच्या दर्शनाला आणि विसर्जनाला घाराबाहेर पडणार असाल तर हे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा आणि निवांत बाप्पााच्या दर्शनाचा लाभ घ्या जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT