Mumbai Boat Accident: भर समुद्रात 13 जणांचा कसा गेला जीव? बोट अपघाताची Inside Story
Gate Way of India Boat Accident Inside Story: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोरील समुद्रात बोटीचा मोठा अपघात झाला. ज्यामध्ये तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गेट वे ऑफ इंडियासमोरील समुद्रात बोटीचा मोठा अपघात
बोट अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू
नेमका अपघात झाला तरी कसा?
मुंबई: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून नजीक समुद्रात बुधवारी (18 डिसेंबर) मोठा अपघात झाला. येथे नीलकमल नावाची एक प्रवासी बोटला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याने ती उलटली. या अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. तर आतापर्यंत एकूण 101 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यात नौदलाची एक बोट वेगाने नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीच्या दिशेने आली आणि तिला धडकली. (gate way of india boat accident how did 13 people die in the sea inside story of the boat accident)
नीलकमल नावाची बोट गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे प्रवाशांना घेऊन जात असताना हा अपघात झाला.
हे ही वाचा>> Gate Way of India Boat Accident: नौदलाच्या बोटीने सरळसरळ मारली धडक, 'तो' भयानक Video जसाच्या तसा...
नौदलाची स्पीड बोटीने आधी नीलकमल बोटीभोवती एक फेरी मारली आणि नंतर पुन्हा दुसऱ्यांदा तिच्या दिशेने येत धडक मारली. ही संपूर्ण घटना बोटीवरील प्रवाशाच्या मोबाइलमध्ये कैद झाली आहे. ही स्पीड बोट नौदलाची असल्याने आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे.

एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, नौदल आणि तटरक्षक दलाने मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू केली, ज्यामध्ये नौदलाच्या 11 नौका, तीन सागरी पोलीस नौका आणि एक तटरक्षक नौका या परिसरात तैनात करण्यात आली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, शोध आणि बचाव कार्यात चार हेलिकॉप्टर सहभागी आहेत.










