Gold PriceToday:'दिवाळी'आधीच ग्राहकांचं 'दिवाळं' निघणार! सोन्याचे आजचे भाव बघूनच बसेल धक्का

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सणासुदींच्या दिवसांत सोनं-चांदीच्या दरात मोठी उसळी

point

ग्राहकांच्या खिशाला बसरणार कात्री

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Today : सणासुदींच्या दिवसांत सोनं-चांदीच्या दरात मोठी उसळी घेतली आहे. सोन्यानं नवा उच्चांक गाठला आहे. सोनं पहिल्यांदाच चक्क 76 हजारांच्या वर गेलं आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ नोंदवल्यानंतर चांदीचा भावही दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता ग्राहकांच्या खिशाला कात्री बसरणार आहे. त्यामुळे आजचे (25 सप्टेंबर) सोने-चांदीचे भाव कितीने वाढले सविस्तर जाणून घेऊया. (Gold-Silver Price too much hike today 25 september 2024 in maharashtra mumbai Pune know the rates)

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी (24 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 76,360 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 660 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 77,020 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,000 रूपये होता. जो 600 रूपयांनी वाढला असून त्याची किंमत 70,600 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 92,800 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Pune Crime: दुरूस्तीसाठी सोसायटीत आला... फरफटत नेत 85 वर्षीय महिलेवर जिन्यात बलात्कार!

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे गेला आहे.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,020 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,770 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,020 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,770 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,020 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,770 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,630 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,050 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,800 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Maharashtra weather: काळजी घ्या! राज्यात पावसाचा धुमाकूळ, 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT