22 and 24 Carat Gold Price in Maharashtra : सोन्याचा नुसता वाढीव कारभार, थेट मार्केट केलंय जाम! 24 कॅरेटचा भाव किती?
24 Carat Gold Rate in Maharashtra : दिवाळी संपताच सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. पण आज (6 नोव्हेंबर 2024) आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याची झळाळी पुन्हा एकदा वाढली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लग्नसराईचा मोसम सुरू होताच सोन्याच्या दरात वाढ
आता सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
24 Carat Gold Rate in Maharashtra : दिवाळी संपताच सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. पण आज (6 नोव्हेंबर 2024) आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याची झळाळी पुन्हा एकदा वाढली आहे. सध्या लग्नसराईचा मोसम सुरू झाला असल्याने ही वाढ अपेक्षित होती. आता सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. खिशाला याचा फटका बसणार आहे. चला तर आजच्या सोने-चांदीच्या किंमतीतील हे बदल सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver prices hike today 6 november 2024 what are the rates of 24 22 and 18 carat gold mumbai pune)
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार की नाही?
Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी (5 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 80,240 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 110 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 80,350 रूपये झाली आहे. तर, 22 carat सोन्याचा भाव 73,550 रूपये होता. त्यातही 100 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 73,650 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 96,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हे वाचलं का?
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 carat सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
हेही वाचा : Asaduddin Owaisi Dhule : सिद्दीकींच्या हत्येवरुन मोदी सरकार, पोलिसांवर निशाणा; मराठा आरक्षणाबद्दल ओवैसी म्हणाले...
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
10gm 22, 24, 18 carat in Mumbai
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,350 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,260 रूपये आहे.
Gold Rate 22, 24, 18 carat in Pune
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,350 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,260 रूपये आहे.
Gold Price 22, 24, 18 carat in Nagpur
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,350 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,260 रूपये आहे.
10gm 22, 24, 18 carat in Nasik
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,680 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,380 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,290 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 carat सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 carat सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT