Asaduddin Owaisi Dhule : सिद्दीकींच्या हत्येवरुन मोदी सरकार, पोलिसांवर निशाणा; मराठा आरक्षणाबद्दल ओवैसी म्हणाले...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी प्रकरणावरुन भाजप सरकारवर निशाणा

point

मराठा आरक्षणाबद्दल काय म्हणाले ओवैसी?

point

धुळ्यातून असदुद्दीन ओवैसींचा महायुतीवर निशाणा

धुळे : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे सर्व पक्षांची निवडणुकीची लगबग सुरू होती, तर दुसरीकडे दसऱ्यासारख्या एका मोठ्या सणाच्या दिवशी राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. याच पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारासाठी आलेल्या असदुद्दीन सिद्दीकी यांनी राज्याचील सत्ताधाऱ्यांसह पोलीस यंत्रणेवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेच्या जगभरात कौतुक केलं जातं, मात्र मोदी शासनाच्या काळात महाराष्ट्रातील पोलीस कमजोर झाली असून, बाबा सिद्दिकींचा हत्येमागचा मास्टरमाईंड अजूनही सापडला नाही असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Kolhapur Congress : दिल्लीतून फोन, बंटी पाटलांनी मिटींग बोलावली, 'या' उमेदवाराची घोषणा, विषय कसा क्लिअर केला?



धुळ्यात एमआयएमचे उमेदवार फारुख शहा यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीने ओवैसी उपस्थित होते. यावेळी असदुद्दीने ओवैसी म्हणाले की, राज्यात भाजपच्या काही लोकांकडून जातीवाचक वक्तव्य केली जात आहेत. त्यांच्यावर देखील आळा घातला जात नाही. महाराष्ट्रात नेमकं चाललय तरी काय? असा सवाल असुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. दहा वर्षात भाजपा सरकारने काय केलं? मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचं काय झालं? तरुण बेरोजगार झाले आहेत असं म्हणत ओवैसी यांनी वेगवेगळ्या विषयांवरुन सरकारला धारेवर धरलं. 

 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Mahayuti Manifesto : लाडकी बहीणचे पैसे वाढवणार, विद्यार्थ्यांना मोठं आश्वासन, महायुतीच्या जाहीरनाम्यातल्या 10 गोष्टी

असदुद्दीन ओवैसी पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले जात आहेत. महायुती सरकारमध्ये असलेले शिंदे-फडणवीस-पवार गप्प का आहेत? असा सवाल असदुद्दीने ओवैसी यांनी केला. महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त लव्ह जिहाद  आणि गौरक्षणाच्या मुद्द्यावर अडकवून ठेवलं जातंय. हिंदू-मुस्लिम वादाच्या मुद्द्यावर सत्ताधारी निवडणूक लढवत आहेत असं म्हणत ओवैसींनी महायुतीवर निशाणा साधला. असदुद्दीन ओवैसी यांच्या या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आता त्यांच्या उमेदवाराला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किती मतदान होतं, हे पाहणं महत्वाचं असणारे आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT