Gold Rate: 'वाढीव तुमचा ह्यो कारभार...'; सोन्याने तर केलंय मार्केट जाम! पाहिलेत का आजचे 1 तोळ्याचे भाव?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सणासुदीच्या काळात भारतात सोने- चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला

point

सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला

point

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे

Gold-Silver Rate Today : सणासुदीच्या काळात भारतात सोने- चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली, त्यामुळे सोने- चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं टेन्शन वाढलं आहे. अशात आता थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण सोन्याच्या किंमतीत थोडी का होईना घसरण झाली आहे. चला तर मग नवीन महिन्याच्या सुरूवातील आज 01 सप्टेंबर 2024 रोजी सोने-चांदीच्या किंमतीत कोणता बदल झाला आहे, जाणून घेऊया. (Gold-Silver rate down 22 24 18 carat today 01 october 2024 in maharashtra mumbai Pune nashik what are the prices)

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. 

हेही वाचा : Maharashtra weather: कुठे मुसळधार तर, कुठे दिलासा... राज्यात आज पावसाचा अंदाज काय? 

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (30 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,240 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 330 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 76,910 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,800 रूपये होता. जो 300 रूपयांनी घसरला असून त्याची किंमत 70,500 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 95,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,500 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,910 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,680 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,500 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,910 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,680 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,500 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,910 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,680 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,530 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,940 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,710 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : पुण्यात राडा! लक्ष्मण हाकेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, मद्यधुंद असल्याचा मराठा तरुणांचा दावा

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT