Maharashtra weather: कुठे मुसळधार तर, कुठे दिलासा... राज्यात आज पावसाचा अंदाज काय?
Mumbai Weather Forecast Today : राज्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला आहे. मात्र मुंबईत सध्या पावसाची उघडीप दिसत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात
राज्यातील 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!
'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Mumbai Weather Forecast Today : राज्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला आहे. मात्र मुंबईत सध्या पावसाची उघडीप दिसत आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. चला तर मग आजचा (01 ऑक्टोबर) पावसाचा अंदाज काय जाणून घेऊयात. (maharashtra Weather Forecast mumbai pune today 01 october 2024 know IMD weather report)
राज्यातील 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!
आज कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर धाराशिव, लातूर, बीड, सातारा, पुणे, नगर, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
हेही वाचा : महालक्ष्मी हत्याकांडात नवा ट्विस्ट! 59 तुकडे करणाऱ्या आरोपीने घेतला गळफास, सुसाइड नोटमध्ये नेमकं काय?
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पालघर, नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना आज IMD कडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
विदर्भात गेले काही दिवस हवामान विभागाकडून सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता. ता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हेही वाचा : प्रेक्षकांनो! 'Bigg Boss Marathi' पुन्हा पाहायचंय ना? फिनालेआधीच घेतला मोठा निर्णय
'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
आज 1 ऑक्टोबरला विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT