Gunaratna Sadavarte यांच्या गाड्या तरुणांनी फोडल्या, सरपंचाला अटक

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Gunaratna Sadavarte vehicles vandalised by maratha kranti morcha activist
Gunaratna Sadavarte vehicles vandalised by maratha kranti morcha activist
social share
google news

Gunaratna Sadavarte Latest News : वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी लक्ष्य केलं. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची बीड जिल्ह्यातील तरुणांनी तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा गावच्या सरपंचांना अटक केली आहे. सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्याचं कारणही समोर आलं आहे. (Gunaratna Sadavarte cars vandalised by maratha kranti morcha activist)

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनाचे हिंसक पडसाद मुंबईत उमटले. मुंबईत गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली.

सदावर्तेंची कार, व्हॅनिटी व्हॅन फोडली

बाहेर पार्क करण्यात आलेल्या गाड्यांवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या गेवराई पायगा येथील संरपंचाच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हल्ला केला. एक कार आणि व्हॅनिटी व्हॅन अशा दोन्ही गाड्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानानंतर मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या.

हे वाचलं का?

Maratha Reservation देणे खरंच शक्य आहे का?, समजून घ्या निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्याकडून

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गुणरत्न सदावर्ते क्रिस्टल टॉवरमध्ये राहतात. त्यांच्या गाड्या रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड केली. तसेच एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही यावेळी दिल्या.

गाड्या फोडताना फेसबुक लाईव्ह

ADVERTISEMENT

पैगा गावच्या सरपंचला अटक…

सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांना अटक केली आहे. मनोज जरांगे यांच्यावर सदावर्तेंनी टीका केली होती. त्या कारणामुळे हा हल्ला करण्यात आला.

ADVERTISEMENT

वकील सदावर्ते यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती. ते काय म्हणाले होते वाचा…

1) “मनोज जरांगे म्हणतो मराठ्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या. नंतर म्हणतो कुणबी करा, ओबीसीतून आरक्षण द्या. अरे बाबा स्वतःला सर्व भाषणात मराठा म्हणतो आणि आरक्षण कुणबीतून. मी शेतकरी आहे. मला शेतमजुरांची भाषा कळते. सगळ्या जाती-धर्माची भाषा मला कळते. लावलं रताळू आली केळी असं कधीच झालं नाही. वस्तुस्थिती समजली पाहिजे.”

समजून घ्या >> Maratha Reservation : 50 टक्क्यांची मर्यादा आली कारण…, सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

2) “जरांगे एका बाजूला मराठा म्हणतो. इथेच कुणबी म्हणून ओबीसीचं फेल झालं. तुमच्याच बोलण्यातून फेल झालं. मला पुढे जाऊन हे सांगायचं की, मग्रुरी आणि घमंडाची भाषा ही केवळ सुपरमसीमध्ये पाहायला मिळते. सुपरमसी म्हणजे काय तर आरक्षण देता येत नाही.”

3) “जरांगेंनी राजकारणी लोकांची नावे घेऊन जरांगेचे जे पॉलिटिकल बॉसेस आहेत, त्यांना आज लॉयल असल्याचे दाखवून दिले आहे की तो किती प्रामाणिक आहे. त्यामुळे बिनबुडाच्या आणि रानभूल लागलेल्या जरांगेवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, जनतेने, मराठा समाजाने, युवकांनी कोणतंही लक्ष देऊ नये. कारण जरांगेला हेच माहिती नाही की, त्याला मराठा म्हणून उभं राहायचं आहे की, कुणबी म्हणून. सरमिसळ आहे. त्यामुळे जरांगेच्या चर्चेला काहीही अर्थ नाही”, असं सदावर्ते म्हणालेले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT