Nagpur Rain : काळरात्र… दोन महिलांचा मृत्यू, 400 जणांना सोडावं लागलं घर; मध्यरात्री काय घडलं?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

heavy rain two women die 400 people have to leave their homes what happened at midnight in nagpur
heavy rain two women die 400 people have to leave their homes what happened at midnight in nagpur
social share
google news

Nagpur flood heavy rain: नागपूर: नागपूरमध्ये (Nagpur) शनिवारी रात्री 2 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. विविध ठिकाणी बचावकार्याद्वारे 400 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनाक्रमात दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला असून 14 जनावरे दगावली आहेत. (heavy rain two women die 400 people have to leave their homes what happened at midnight in nagpur)

ADVERTISEMENT

नागपूरकरांसाठी काळरात्र

शनिवारी रात्री 2 वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला सतत दोन तास विजांचा कडकडाटासह 4 तासात 109 मि.मी. पाऊस कोसळला. यातील पहिल्या 2 तासांमध्ये 90 मि.मी. पाऊस झाला. परिणामी शहरातील अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हर फ्लो होवून हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले आणि नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्तीमध्ये शिरले.

या परिस्थितीचा सामना करण्याकरिता प्रशासनाने पावले उचलली. शहरात तात्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) आणि लष्करांचे प्रत्येकी दोन दल दाखल झाले व बचावकार्य सुरु झाले.

हे वाचलं का?

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूरसह जिल्हयातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मूक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

हे ही वाचा>> Nagpur Rain: नागपुरात ढगफुटी… चार तासात तुफान पाऊस, शहरात पुरामुळे भीषण परिस्थिती

यासोबतच शहराच्या सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. 400 नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले.

ADVERTISEMENT

दोन महिलांनी गमावला जीव

या सर्व घटनाक्रमात घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (वय 70 वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (वय 80 वर्षे) यांचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

nagpur 3

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पहाटे 5 वाजेपासून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन बचाव कार्याचे नियंत्रण केले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महानगर पालिका कार्यालयातील वॉर रुममधून परिस्थितीचा आढावा घेतला. हजारीपहाड (सह्याद्री) भागात अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली आहेत.

हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

हे ही वाचा>> Century Rayon Blast : उल्हासनगरमध्ये सेंच्युरी कंपनीत स्फोट, कामगारांच्या उडाल्या चिंधड्या

नंदनवन परिसरतील स्वातंत्र्य गल्ली क्र. 4 व 6 झोपडपट्टी भागासह जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष भेट दिली. याभागातील घरांची पडझड झाली आहे. घरांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी शिरले आहे. प्रशासनाच्यावतीने कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातून सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, धोकादायक घरातील नागरीकांना घरातून सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सक्करदरा गार्डन, मोरभवन बसस्थानकामध्येही पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र होते.

nagpur 5

दरम्यान, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT