Ganeshotsav 2023: भारतातील गणेशोत्सवाचा इतिहास, लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यातील वाद काय?
सध्या महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये गणेशोत्सवाचा प्रचंड उत्साह आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची सारेच आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी हा १० दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा सण १९ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे.
ADVERTISEMENT

Lokmanya Tilak and Bhausaheb Rangari Controversy : सध्या महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये गणेशोत्सवाचा प्रचंड उत्साह आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची सारेच आतुरतेने वाट पाहत आहेत. गणपती बाप्पा विराजमान होण्याआधी लोकांमध्ये जे उत्साहाचे वातावरण असतं ते काही औरच. दरवर्षी हा १० दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा सण १९ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. (History of Ganeshotsav What is the controversy between Lokmanya Tilak and Bhausaheb Rangari)
पण तुम्हाला गणपती बाप्पाच्या या सणाचा इतिहास माहितीये का? महाराष्ट्रात प्रथम गणपती उत्सव साजरा करण्यात आला, हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून ओळखू जाऊ लागला. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्याची रणनीती बनवण्यासाठी बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता. आज संपूर्ण भारतात हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो.
वाचा: PM Modi Speech in Parliament : मोदींनी नेहरूंचं केलं कौतुक, काय म्हणाले?
गणेश उत्सवाची सुरूवात कुठे झाली?
हा उत्सव धार्मिक न होता राजकीय कारणांसाठी सुरू करण्यात आला होता. ब्रिटीश राजवटीत जेव्हा अत्याचार वाढू लागले आणि कलम 144 नुसार, इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना गटांमध्ये एकत्र येण्यापासून रोखले, तेव्हा प्रसिद्ध क्रांतिकारक लोकमान्य टिळकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन आणि अनोखा मार्ग शोधून काढला. टिळकांनी 1894 मध्ये पुण्यातील शनिवाड्यात गणपती उत्सव सुरू केला. त्यांच्या केसरी वृत्तपत्रातही याचा उल्लेख करण्यात आला होता. देशातील हा पहिला सार्वजनिक गणपती उत्सव होता. पूर्वी लोक फक्त घरातच गणपती उत्सव साजरा करत असत.
लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यातील वाद काय?
पहिला सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली सुरू केल्याचा दावा, 2017 मध्ये भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने केला होता. त्यांच्या मते, लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. याआधी, 2 वर्ष अगोदर म्हणजे 1892 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.










