महिलेने ऑफिसमध्येच काढली पुरूष कर्मचाऱ्याची पँट, नको ते करणं महिलेला पडलं महागात..

मुंबई तक

दक्षिण कोरियामधील एका रेस्टॉरंटमध्ये महिलेने संपूर्ण टीमसमोर पुरुष सहकाऱ्याची पँट काढली. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि महिलेला 2000 डॉलर्स म्हणजेच 1 लाख 70 हजार रुपये दंड भरावा लागला.

ADVERTISEMENT

महिलेने ऑफिसमध्येच काढली पुरूष कर्मचाऱ्याची पँट
महिलेने ऑफिसमध्येच काढली पुरूष कर्मचाऱ्याची पँट (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेने सगळ्यांसमोर काढली पुरुष कर्मचाऱ्याची पँट

point

कामाच्या ठिकाणी केला नको तो प्रकार!

point

महिलेविरुद्ध तक्रार दाखल

South Korea News: दक्षिण कोरियामध्ये मस्करी करण्याच्या नादात एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका महिलेने संपूर्ण टीमसमोर पुरुष सहकाऱ्याची पँट काढली. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि महिलेला 2000 डॉलर्स म्हणजेच 1 लाख 70 हजार रुपये दंड भरावा लागला.

कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याची पँट काढणे आणि चुकून त्याचे अंतर्वस्त्र काढून टाकणे हा लैंगिक गैरवर्तनाचा प्रकार असल्याचा निकाल दक्षिण कोरियाच्या गँगवॉन प्रांतातील एका न्यायालयाने दिला आहे. कोरिया हेराल्डच्या वृत्तानुसार, चुन्चेओन  जिल्हा न्यायालयाने अलीकडेच महिलेला 2000 डॉलर्सच्या दंडाव्यतिरिक्त आठ तासांचे लैंगिक हिंसाचार प्रतिबंधक शिक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले.

रेस्टॉरंटमध्ये घडली घटना 

ही घटना 3 ऑक्टोबर 2024 मध्ये घडली. त्यावेळी महिलेने इतर सहकाऱ्यांसमोर तिच्या पुरुष सहकाऱ्याची पँट खाली काढली. ही घटना त्याच रेस्टॉरंटमध्ये घडली जिथे ते दोघेही काम करत होते. मस्करी करत पुरुष सहकाऱ्याची पँट ओढताना महिलेने चुकून त्याची अंडरवेअरही काढली. त्या महिलेचे वय 50 वर्षे असून तिने त्याच्या 20 वर्षांच्या तरुण सहकाऱ्यासोबत असा प्रॅंक केला.

हे ही वाचा: महिला हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेली रंगात, पतीची अचानक एंट्री.. थेट छातावरून मारली उडी

महिलेचा दावा न्यायालयाने फेटाळला

हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर महिलेने मस्करी म्हणून हे कृत्य केल्याचा दावा केला. मात्र, दक्षिण कोरियाच्या चुन्चेओन  जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांनी महिलेचा हा दावा फेटाळून लावला. त्याच वेळी, तक्रारदाराने महिलेच्या अशा कृत्यामुळे त्याचा लैंगिक अपमान झाला आणि त्याने दबावाखाली अश्लील कृत्य केल्याचा आरोप दाखल केला आहे. 

हे ही वाचा: महिलेनं आधी नवऱ्याला सोडलं, नंतर दुसरा धरला अन् थेट मुलालाच...आई नाही ही तर कसाई

तक्रारे केलेल्या तरुणाची बाजू विचारात घेऊन न्यायालयाने महिलेला दंड भरण्याचे आणि लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी आठ तासांचे शिक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले. खरंतर, आरोपी महिलेचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता, तिला तिच्या गैरकृत्याबद्दल पश्चात्ताप झाला होता आणि तिने पीडित पुरुष आणि त्याच्या पालकांची गुडघ्यावर बसून माफी मागितली होती. महिलेने शिक्षा सुनावताना या सगळ्याचा विचार केला होता.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp