'खासदार बायका नाचवतो, जिल्ह्यात फिरला तर कपडेच...', ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची शिंदेंच्या खासदाराला धमकी - Mumbai Tak - thackeray group threat to cm eknath shinde mp hemant patil thackeray vs shinde shivsena supreme court - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

‘खासदार बायका नाचवतो, जिल्ह्यात फिरला तर कपडेच…’, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची शिंदेंच्या खासदाराला धमकी

ठाकरे गटाच्या नेत्याने शिंदेच्या खासदाराला धमकी दिली आहे. खासदार हेमंत पाटील जर जिल्ह्यात फिरले तर त्यांचे कपडे काढू, असा धमकीवजा इशारा ठाकरे गटाच्या नेत्याने शिंदे गटाच्या खासदाराला दिला आहे.
thackeray group threat to cm eknath shinde mp hemant patil thackeray vs shinde shivsena supreme court

Hemant Patil Threat to thackeray Group : शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. यानंतर ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, यावर आजपासून सुनावणी पार पडतेय. या सुनावणी दरम्यानच ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात या निर्णय़ावर सुनावणी पार पडत असताना, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्याने शिंदेच्या खासदाराला धमकी दिली आहे. खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) जर जिल्ह्यात फिरले तर त्यांचे कपडे काढू, असा धमकीवजा इशारा ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्याने शिंदे गटाच्या (Shinde Group) खासदाराला दिला आहे. (thackeray group threat to cm eknath shinde mp hemant patil thackeray vs shinde shivsena supreme court)

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्याचे वातावरण तापले आहे. याच आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांचे हिंगोलीत धरणे आंदोलन सुरु आहे. ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख विनायक भिसे व संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोलीतील कार्यालयासमोर सुरु होते. या धरणे आंदोलना दरम्यान विनायक भिसे यांनी हेमंत पाटील यांना धमकी दिली आहे.

हे ही वाचा : PM Modi Speech in Parliament : मोदींनी नेहरूंचं केलं कौतुक, काय म्हणाले?

मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम असताना हा खासदार बायका नाचवतो, असा गंभीर आरोप सुरुवातीला विनायक भिसे यांनी हेमंत पाटील यांच्यावर केला. तसेच हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत, त्यामुळे यापुढे खासदार हेमंत पाटील जर जिल्ह्यात फिरले तर त्यांचे कपडे काढू, असा धमकीवजा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी हेमंत पाटील यांना दिला आहे. आता या धमकीवर शिदें गटाचे खासदार हेमंत पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : Pune Murder : दारू पिऊन दोस्तीत केली कुस्ती, अन् नंतर सगळं भयानकच घडलं

पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली..