तरुणांना LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, झटपट भरा फॉर्म, 'ही' आहे शेवटची तारीख
LIC कडून हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिससाठी मोठी भरती करण्यात आली आहे. ही अप्रेंटिसशिप एक वर्ष कालावधीसाठी असेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
LIC मध्ये नोकरीची मोठी संधी
LIC हाउसिंग फायनान्समध्ये अप्रेंटिससाठी भरती
काय आहे अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता?
Job Vacancy: ग्रॅज्युएशनची डिग्री असलेले बरेच तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतं. LIC म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने नव्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. LIC कडून हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिससाठी मोठी भरती करण्यात आली आहे. ही अप्रेंटिसशिप एक वर्ष कालावधीसाठी असेल. तसेच, यामध्ये निवड झालेल्या तरुणांना दर महिन्याला चांगलं स्टायपेंड मिळेल.
या भरतीच्या माध्यमातून सुमारे 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता, सविस्तर जाणून घ्या.
शैक्षणिक पात्रता
ज्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएशनची डिग्री असेल, ते तरुण या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 20 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.









