कोकणासह सातारा, सांगली अन् कोल्हापुरात नुसता धो धो बरसणार, वाचा आजचं हवामान

मुंबई तक

Maharashtra Weather Update : राज्यात 16 जून रोजी ठिकठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई आणि पालघरमध्ये पावसाने दमदार बॅटींग केली आहे. तर अशातच 17 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra weather Update
Maharashtra weather Update
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यभरात धोधो बरसणार

point

कोकणाला येलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Update : राज्यात 16 जून रोजी ठिकठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई आणि पालघरमध्ये पावसाने दमदार बॅटींग केली आहे. तर अशातच 17 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 12 जून रोजी मान्सूनच्या वेगात वाढ दिसून आल्याचं चित्र आहे. 

हेही वाचा : Rain Update: पुढील 3 तास धोक्याचे, IMD कडून ठाणे जिल्ह्यासाठी Red अलर्ट जारी.. अतिमुसळधार पाऊस

मान्सूनच्या सर्वसाधारण अंदाजानुसार, यंदा मान्सून महाराष्ट्रात लवकरच दाखल झाला आहे. 12 ते 17 जून या कालावधीत हवामान खात्याने मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवली होती. विशेष म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांचा त्यामध्ये समावेश आहे. 

कोकणात अतिमुसळधार मान्सून

कोकणचा विचार केल्यास, 17 जून रोजी किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धिंगाण घालणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई उपनगरात पाऊस धिंगाणा घालणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा असून पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.  

सातारा, सांगली आणि कोल्हापूरात काय आहे मान्सून स्थिती

मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस धिंगाणा घालणार आहे. या भागात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला द्यावा, करण पावसाचा जोर अधिक वाढू शकतो. 

हे वाचलं का?