भल्या पहाटे काळाचा घाला.. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर बस दरीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

मुंबई तक

Pune Accident: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस दरीत कोसळून तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (15 मार्च) पहाटेच्या सुमारास घडली आहे.

ADVERTISEMENT

Pune uncontrolled bus fell into 500 feet deep gorge 13 killed
Pune uncontrolled bus fell into 500 feet deep gorge 13 killed
Google CTA

खोपोली: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती तेव्हा अचानक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. सध्या बसमधील 16 जखमी प्रवाशांना बाहेर काढलं असून त्यांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतरही प्रवासी बसमध्ये अद्यापही अडकलेले असून बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (horrific accident on old pune mumbai highway uncontrolled bus fell into 500 feet deep gorge 13 killed)

नेमका अपघात कसा घडला?

लोणावळ्याजवळील खोपोली येथे आज (15 मार्च) पहाटे 4 वाजेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक बस अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली. ज्यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती तेव्हा अचानक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. सध्या बसमधील 16 जखमी प्रवाशांना बाहेर काढलं असून त्यांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतरही प्रवासी बसमध्ये अद्यापही अडकलेले असून बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अधिक वाचा – Viral Video : बिकिनी, कपल किस आणि पेपर स्प्रे …या घटनांनमुळे दिल्ली मेट्रोत सापडली वादात

दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणावळ्याजवळील खंडाळा घाट परिसरातील शिंगरोबा मंदिराजवळ ही घटना घडली. येथून जाणारी बस बाजूचा अडथळा तोडून थेट 500 फूट खोल दरीत कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे.