पर्यटकांसमोर नाचवल्या वसतिगृहातील मुली, नाशिकमधला धक्कादायक प्रकार

ADVERTISEMENT

hostel girls danced in front of tourists a shocking incident in nashik trimbakeshwar
hostel girls danced in front of tourists a shocking incident in nashik trimbakeshwar
social share
google news

नाशिक (Nashik) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर (trimbakeshwar) तालुक्यातील पहिने गावातील वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना खाजगी रिसॉर्टमध्ये पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पालकांनी मुलींना घरी बोलावून, या प्रकरणी संस्था चालक आणि शिक्षिकांविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आला आहे. (hostel girls danced in front of tourists a shocking incident in nashik trimbakeshwar)

त्र्यंबकेश्वर (trimbakeshwar) तालुक्यातील पहिने येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेला जोडून यंदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी असताना वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना 31 मे 2023 पासूनच प्रवेश देण्यात आला होता. सुट्टीत मुलींना पारंपरिक नृत्य व संगणक शिक्षण देण्यासाठी संस्थेने त्यांना लवकर प्रवेश दिल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिले जात नसल्याचा आरोप आता मुलींनी केला आहे. तसेच संस्थेची सहावीपर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी 3500 रुपये अनामत रक्कम जमा केली.

हे ही वाचा : Pune : दर्शना पवारची हत्याच! दोघे राजगडावर गेले, पण राहुल एकटाच परतला

दरम्यान या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर एक हॉटेल आहे.या हॉटेलात मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. या पर्यटकांसमोर सायंकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान नाचण्यास सांगितले जाते. जर पर्यटकांसमोर नाचले नाही तरी शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली होती. विशेष म्हणजे ही शाळा आणि रिसॉर्ट एकच मालकाचे असल्याची चर्चा या भागात आहे. त्यामुळेच ही घटना घडल्याची माहिती आहे.दरम्यान या प्रकारामुळे पालकांनी मुलींना घरी आणले असून, या प्रकरणी संस्थेचे चालक आणि शिक्षिकेविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Wardha Video : केक कापायला गेला अन् तोंडच जळालं, बर्थडे बॉयसोबत काय घडलं?

दरम्यान याआधी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीचा बलात्कार करून तिची हत्या केली होती. वसतिगृहात चौकीदारानेच हे कृत्य केले होते. या कृत्यानंतर चौकीदाराने लोकल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती.या घटनेची तक्रार मयत विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली होती.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT