मुंबई Tak च्या शिरपेचात मानाचा तुरा, mumbaitak.in ला मानाचा ENBA पुरस्कार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई Tak वेबसाईटला मानाचा ENBA पुरस्कार
मुंबई Tak वेबसाईटला मानाचा ENBA पुरस्कार
social share
google news

ENBA Award to Mumbai Tak website: नवी दिल्ली: मुंबई Tak या आमच्या डिजिटल चॅनलसोबतच आमची mumbaitak.in या वेबसाइटने अल्पावधीतच आपला ठसा मराठी मनावर उमटवला आहे. ज्याची दखल राष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणाऱ्या ENBA पुरस्कार सोहळ्यात घेण्यात आली. राजधानी दिल्लीत पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात mumbaitak.in या आपल्या वेबसाइटला यंदाचा ‘बेस्ट मायक्रोसाईट रिजनल चॅनल’ चा ENBA सुवर्ण पुरस्कार बहाल करण्यात आला. (in honor of mumbai tak mumbaitak in website receives enba best microsite regional channel gold award)

मराठी बातम्यांच्या विश्वात mumbaitak.in ने नेहमीच आपला दर्जेदार आणि सकस असा कंटेट आपल्या वाचकांना दिला आहे. त्यामुळे ENBA चा हा पुरस्कार मुंबई Tak च्या शिरपेचातील एक मानाचा तुरा आहे. 

अगदी कमी वेळातच.. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मुंबई Tak च्या वेबसाईट आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजधानी मुंबईतील राजकीय घडामोडी ते महाराष्ट्रातील गावागावातील राजकीय बातम्याच्या बाबतीत mumbaitak.in हे  बातम्यांच्या विश्वातील सर्वात विश्वसनीय नाव ठरलं आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डिजिटल विश्वात जिथे अनेक न्यूज वेबसाइट या क्लिकबिट सारखे फंडे वापरतात तिथे mumbaitak.in ने फक्त विश्वासार्ह आणि परिणामकारक अशा बातम्या देत आपली एक नवी ओळख बनवली आहे. 

शहरी भागापासून महाराष्ट्रातील गावागावात.. आज सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मुंबई Tak च्या वेबसाइटचाच बोलबाला आहे. अनेक माध्यम समूहांनी मुंबई Tak चे एक्सक्लुझिव्ह मुलाखती आणि बातम्यांना आपल्या प्रकाशनात स्थान दिलंय. 

ADVERTISEMENT

दमदार आणि परिणामकारक बातम्या हीच mumbaitak.in ची खरी ओळख आहे. त्यामुळेच मागील सहा महिन्यात वेबसाइटचे यूजर्स हे 134 टक्क्यांनी वाढले आहेत. तर पेज व्ह्यूचा विचार केल्यास त्यामध्ये 381 टक्क्यांची वाढ झाली आहे. mumbaitak.in ला मिळणारी ही एक मोठी पोचपावतीच आहे. म्हणूनच mumbaitak.in ची पसंती  दिवसेंदिवस वाढत आहे. 

ADVERTISEMENT

आपणा सर्वांचा उंदड प्रतिसाद आणि प्रेमामुळेच मुंबई Tak ने या मानाच्या पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे तुमच्या लाडक्या mumbaitak.in वर असाच लोभ असू द्या!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT