Irshalwadi Landslide : “आम्ही हाताने माती उकरून लेकरं बाहेर काढली”

मुंबई तक

ADVERTISEMENT

after heavy rainfall in kokan major landslide in irshalwadi village of raigad district.
after heavy rainfall in kokan major landslide in irshalwadi village of raigad district.
social share
google news

Irshalwadi news : ‘आम्ही गाढ झोपेत होतो. अचानक मोठा आवाज आला. बघतो तर आमच्यावरही काही प्रमाणात मातीचा ढिग पडला होता. आम्ही हाताने माती बाजूला केली. आमची लेकरंही दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली होती. मग आम्ही त्यांना माती उकरून बाहेर काढलं आणि खाली पळून आलो’, थरकाप उडवणारी ही आपबीती सांगितली इर्शाळवाडी दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांनी. (Irshalgad Landslide : major landslide in irshalwadi village of raigad district, what happened in mid night?)

इर्शाळगडाच्या पायथ्याला लागून 48 कुटुंबाची एक वाडी आहे. नाव आहे इर्शाळवाडी. मिळालेल्या माहितीनुसार लहानथोरांसह 250 च्या जवळपास लोक इथे वास्तव्यास आहेत. पण, गुरुवारी (20 जुलै) इर्शाळवाडीवर काळाने झडप घातली अन् सर्व काही उद्ध्वस्त झालं. या दुर्घटनेत वाचलेल्या काहींनी नेमकं काय घडलं? याबद्दल थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला.

वाचा >> इर्शाळवाडी : दरडीने गिळलं गाव, 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली

या दुर्घटनेतून जीव वाचलेल्या इर्शाळवाडीतील नागरिकांनी नेमकं काय घडलं, याची आपबीती सांगितली. एका महिलेने सांगितले की, आम्ही झोपलेलो होतो. नेमकं काय घडलं हे माहितीच नाही. पण, आम्ही ढिगाऱ्याखालून स्वतःच बाहेर आलो. आम्ही आमची लेकरं ढिगाऱ्याखालून बाहेर काढली आणि खाली आलो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसऱ्या एका महिलेने सांगितलं की, आम्ही झोपलेलो होतो. त्यामुळे कसं घडलं याबद्दल माहिती नाही. आम्ही झोपेत होतो. त्यावेळी आवाज आला आणि आम्ही उठलो. मग भाऊ आणि वहिनीने दोन मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली होती. मग आम्ही त्यांना माती उकरून बाहेर काढलं आणि घरातून बाहेर पळालो. जेव्हा आम्ही बाहेर आल्यानंतर आजूबाजूला बघितलं, तेव्हा सर्व घरं बुजली गेली होती. मोठी झाड पडलेली होती.

ADVERTISEMENT

या दुर्घटनेतून वाचलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, आम्हाला झोपेत काहीच समजलं नाही. आमचं घर खचलं म्हणून आम्हाला हे कळलं. आमचं घर खालच्या बाजूने आहे. दरड कोसळली.

ADVERTISEMENT

दरड कोसळल्यानंतर इर्शाळवाडीतील परिस्थिती काय?

इर्शाळवाडीत दरड कोसळल्यानंतर काही स्थानिक नागरिक वरती जाऊन उद्ध्वस्त वाडी बघून आले. एका व्यक्तीने सांगितलं की,प्रचंड नुकसान झालं आहे. काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहे. चार मृतदेह सापडले आणि दोघांना जिवंत बाहेर काढलं. इर्शाळवाडी गावात 250 च्या जवळपास लोक वास्तव्याला आहेत. पण, काही लोक शेतात होते. काही लोक मासे पकडायला गेलेले होते. ते सगळे आल्याशिवाय नेमकं कळणार नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT