Chandrayaan-3 : इस्रोसाठी वाईट बातमी! चंद्रावर झाली सकाळ पण, विक्रम लँडर…
इस्रो टीम 22 सप्टेंबर 2023 पासून विक्रम लँडरला सतत संदेश पाठवत आहे. पुढील काही दिवस सूर्यास्त होईपर्यंत आणखी संदेश पाठवत राहतील. पण यावरून तरी असं दिसतंय की, चांद्रयान-3 मोहीमेचा शेवट झालेला आहे. भारताने जगाला जे दाखवायचं होतं ते दाखवून दिलं आहे.
ADVERTISEMENT

Chandrayaan-3 Mission : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अजूनही झोपेतून उठलेले नाहीत. 20 सप्टेंबर 2023 रोजी त्यांच्या लँडिंग पॉईंटवर म्हणजेच शिवशक्ती पॉईंटवर सकाळ झाली. सूर्याचा प्रकाश पोहोचला होता. पण त्या प्रकाशाने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अजूनही जागे झालेले नाहीत. (ISRO chandrayaan-3 vikram lander and pragyan rover not Active Yet)
इस्रो टीम 22 सप्टेंबर 2023 पासून विक्रम लँडरला सतत संदेश पाठवत आहे. पुढील काही दिवस सूर्यास्त होईपर्यंत आणखी संदेश पाठवत राहतील. पण यावरून तरी असं दिसतंय की, चांद्रयान-3 मोहीमेचा शेवट झालेला आहे. भारताने जगाला जे दाखवायचं होतं ते दाखवून दिलं आहे.
पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई, 19 कोटींची…
इस्रोने विक्रम लँडरची यशस्वीपणे लँडिंग केली. प्रज्ञान रोव्हर 105 मीटर चालवण्यात आला. विक्रम लँडरनेही उडी मारून दाखवले. अनेक आवश्यक वायू आणि ऑक्सिजन सारख्या खनिजांच्या उपस्थितीची पुष्टी झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारी ही जगातील पहिली मोहीम होती. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला.
आता फक्त आशेचे किरण… पण अॅक्टिव्ह होणं कठीण!
याआधी फक्त अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनकडे सॉफ्ट लँडिंगचे प्रभुत्व होते. जेव्हा रात्र झाली तेव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्वीच केलं होतं. पण यापूर्वी त्याच्या दोन्ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होत्या. प्रज्ञानचे सोलर पॅनल सूर्याकडे तोंड करून होते. जेणेकरून सकाळ होताच सूर्यप्रकाश थेट त्यावर पडेल. प्रकाश मिळाल्यानंतर ते पुन्हा अॅक्टिव्ह होतील, अशी आशा होती.










