पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रीतीसोबत भयंकर घडलं, संचालकाविरोधात गुन्हा दाखल
jalna crime news : जालना जिल्ह्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा खदाणीत बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रीतीसोबत भयंकर घडलं
संचालकाविरोधात गुन्हा दाखल
Jalna Crime News : जालन्यातील अंबड तालुक्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रीती भाकड असे या मृत तरुणीचे नाव असून ती दहीगव्हाण खुर्द येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील होती. पोलीस दलात भरती होऊन आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रीती अंबड येथील एका खासगी पोलीस भरती प्रशिक्षण अकादमीमध्ये सराव करत होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, प्रशिक्षण केंद्राच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप तरुणीला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
भरती प्रक्रियेमध्ये पोहण्याची अट नसतानाही सराव
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे अकादमीच्या इतर विद्यार्थ्यांसोबत शारीरिक सरावासाठी अंबड शहराच्या जवळील वलखेडा शिवार येथील खदान परिसरात गेली होती. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पोहण्याची कोणतीही अट किंवा अनिवार्य सराव नसतानाही, अकादमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश भागवत वायसे यांनी प्रीतीला खदाणीच्या खोल पाण्यात उतरण्यास भाग पाडले. प्रीतीला पोहता येत नाही, ही बाब प्रशिक्षण देणाऱ्यांना माहिती असतानाही तिला पाण्यात उतरण्यास सांगणे, हा मोठा निष्काळजीपणा असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने प्रीती बुडू लागली, तिला वाचवण्याचा सहकाऱ्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
हेही वाचा : 'तू उशीरा का आलीस?' हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...; पोलिसानं हे काय केलं?









