जेजुरीकर जिंकले! मार्तंड देवस्थान विश्वस्तांबद्दल धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय
विश्वस्त मंडळातील सदस्यांची संख्या आता 7 वरून 11 करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे 11 विश्वस्त नियुक्त केले जाणार आहे. यापैकी 6 विश्वस्त हे जेजुरीतील असणार आहे, तर 5 जेजुरीबाहेरील.
ADVERTISEMENT

Jejuri Trustee Controversy : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबारायाची जेजुरी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मार्तंड देवस्थान समितीवर नेमण्यात आलेल्या विश्वस्तांवरून हा वाद सुरू झाला. जेजुरीकर धर्मादाय आयुक्तालयाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले. जेजुरीकरांच्या ठाम निश्चयासमोर आता धर्मादाय आयुक्तांना मोठा निर्णय घ्यावा लागला, ज्यामुळे जेजुरीकरांचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे.
मागील 13 दिवसांपासून जेजुरीतील ग्रामस्थांनी विश्वस्तांच्या नियुक्तीला विरोध केला. नागरिकांसह सामाजिक संघटनांनी या निर्णयाविरोधात वेगवेगळी आंदोलने आणि मोर्चातून मागणीकडे लक्ष वेधून घेतले. जेजुरीकरांकडून सुरू असलेल्या या आंदोलनाची अखेर दखल घ्यावी लागली आहे.
Video >> कोल्हापूर हिंसाचारावर कोण काय म्हटलं? शरद पवार, देवेंद्र फडणवीस आमनेसामने
मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळातील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याऐवजी धर्मादाय आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विश्वस्त मंडळातील सदस्यांची संख्या आता 7 वरून 11 करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे 11 विश्वस्त नियुक्त केले जाणार आहे. यापैकी 6 विश्वस्त हे जेजुरीतील असणार आहे, तर 5 जेजुरीबाहेरील.
फेरविचार याचिकेवर सुनावणी
बाहेरील विश्वस्तांच्या निवडी केल्याने नाराज झालेल्या ग्रामस्थांनी जेजुरीत विविध प्रकारच्या आंदोलने केली होती तसेच धर्मदायुक्तांकडे बाबत पुनर्विचार याचिका दाखल केली होती त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. झालेल्या निर्णयानुसार आता 7 ऐवजी 11 विश्वस्तांची निवड करून तिढा अखेर सोडवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.