Naresh Goyal : “मला तुरुंगातच मरु द्या”, जेट एअरवेजच्या संस्थापकांना न्यायालयात अश्रू अनावर

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Naresh Goyal told the judge with tears in his eyes, 'I have become very weak and there is no point in referring me to JJ Hospital.
Naresh Goyal told the judge with tears in his eyes, 'I have become very weak and there is no point in referring me to JJ Hospital.
social share
google news

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल शनिवारी (6 जानेवारी) मुंबईतील विशेष न्यायालयात भावूक झाले. हात जोडून गोयल यांनी न्यायालयाला तुरूंगात ठेवण्याची विनंती केली. “माझ्या सर्व आशा मावळल्या आहेत. अशा स्थितीत जगण्यापेक्षा मला तुरुंगातच मरु द्या”, असे सांगताना नरेश गोयल यांना अश्रू अनावर झाले. गोयल हे कॅनरा बँकेच्या 538 कोटी रुपयांच्या फसवणुकीतील आरोपी आहेत. (Naresh Goyal, Founder of Jet Airways told the court that he had “lost every hope of life” and that he would “rather die in jail than live in his present condition”)

कोर्टाच्या रेकॉर्डनुसार, ‘सत्तर वर्षीय नरेश गोयल यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांनी कोर्टात सांगितले की, त्यांना त्यांची पत्नी अनिताची खूप आठवण येते, जी कॅन्सरच्या पहिल्या अवस्थेत आहे. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी एका कथित बँक फसवणूक प्रकरणात गोयल यांना अटक केली होती. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

नरेश गोयल यांनी केली होती विनंती

गोयल यांनी विशेष न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि कारवाईदरम्यान जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांनी काही मिनिटांसाठी वैयक्तिक सुनावणीची विनंती केली, ज्याला न्यायाधीशांनी परवानगी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोर्टाच्या ‘रोझनामा’ (दैनंदिन सुनावणीची नोंद) नुसार, “नरेश गोयल यांनी हात जोडून सांगितले की, त्यांची तब्येत खूपच खराब आहे. यावेळी ते सतत थरथरत होते.”

हेही वाचा >> “बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ‘आला होता तो संजय राऊत माझ्याकडे”, संजय निरुपमांनी सांगितली खासदारकीची इनसाईड स्टोरी

न्यायाधीश म्हणाले, “मी त्यांचे म्हणणे धीराने ऐकले आणि त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले, तेव्हा त्यांच्याकडेही लक्ष दिले. त्यांचे संपूर्ण शरीर थरथरत असल्याचे मला दिसले. त्यांना उभे राहण्यासाठी देखील आधाराची गरज आहे. गुडघ्याकडे बोट दाखवत नरेश गोयल म्हणाले की, “ते सुजले आहेत आणि वेदना होताहेत.” त्यांना पाय वाकवता येत नव्हते. जेट एअरवेजच्या संस्थापकाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की त्यांना लघवी करताना तीव्र वेदना होतात आणि कधीकधी असह्य वेदनांसह लघवीतून रक्त देखील येते.

ADVERTISEMENT

त्यांनी न्यायालयाला सांगितले की, “बहुतेक वेळा मला मदत मिळत नाही. तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही मदत करण्याच्या मर्यादा आहेत.”

ADVERTISEMENT

गोयल यांनी जेजे रुग्णालयात न पाठवण्याची केली विनंती

न्यायालयाच्या डायरीनुसार, नरेश गोयल यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते न्यायाधीशांना म्हणाले, “मी खूप अशक्त झालो आहे आणि मला जेजे रुग्णालयात पाठवण्यात काही अर्थ नाही. आर्थर रोड तुरुंगातून इतर कैद्यांसह हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास खूप त्रासदायक आणि कंटाळवाणा आहे, जो मला सहन होत नाही. येथे नेहमीच रुग्णांची लांबच लांब रांग असते आणि मी वेळेवर डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर माझी तपासणी करतात, तेव्हा पुढील पाठपुरावा करणे शक्य नसते. या गोष्टींचा माझ्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहे.”

हेही वाचा >> भाच्याने घेतला मामाचा बदला! शरद मोहोळचा असा काढला काटा?

“माझी पत्नी अनिता कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची काळजी घेणारे कोणी नाही. कारण माझी एकुलती एक मुलगीही आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे”, असेही गोयल यांनी न्यायालयाला सांगितले.

“मला जेजे रुग्णालयात पाठवू नका, त्याऐवजी मला तुरुंगातच मरू द्या”, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. “माझ्या आयुष्यातील प्रत्येक आशा मालवली आहे आणि अशा परिस्थितीत जगण्यापेक्षा मरणे चांगले आहे.” नरेश गोयल म्हणाले की, त्यांची तब्येत न्यायालयात येण्यासाठी साथ देत नाही. यावेळी त्यांना कोर्टात हजर केले जावे, जेणेकरुन त्यांना सर्व काही प्रत्यक्ष सांगता येईल, अशी त्यांची इच्छा होती.

गोयल यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश म्हणाले, ‘त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे मी लक्ष दिले आहे. त्यांना असहाय्य सोडले जाणार नाही आणि योग्य उपचारांसह त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.

‘आता मला तुरुंगात मरू द्या’

न्यायालयाने नरेश गोयल यांच्या वकिलांना त्यांच्या प्रकृतीबाबत योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. गेल्या महिन्यात दाखल केलेल्या त्याच्या जामीन याचिकेत गोयल यांनी हृदयरोग, प्रोस्टेट आणि ऑर्थोपेडिक यासारख्या अनेक आरोग्य समस्यांचा उल्लेख केला होता आणि असा दावा केला होता की ‘ते दोषी नाही’ यावर विश्वास ठेवण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे आणि वाजवी कारणे आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर ईडीने उत्तर दाखल केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे.

हेही वाचा >> भावाची हत्या झाली त्याच ठिकाणी ठोकलं शरदला, पुण्यातील गँगवॉरचा इतिहास काय?

ED ने CBI (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) च्या FIR च्या नुसार जेट एअरवेज, नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता आणि आता बंद पडलेल्या खासगी विमान कंपनीच्या काही माजी अधिकार्‍यांवर कॅनरा बँकेतील 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी मनी लाँड्रिंगचे गुन्हे दाखल केले आहेत. पीएमएलए कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅनरा बँकेने जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडला 848.86 कोटी रुपयांचे क्रेडिट आणि कर्ज मंजूर केल्याचा आरोप करून एफआयआर दाखल करण्यात आला, त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकित आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT