Govt Job: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी, 10 वी पास विद्यार्थ्यांना थेट मिळणार जॉब
बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये शिपाई (Office Assistant/ Peon) च्या जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 निश्चित केली गेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी
10 वी पास विद्यार्थी करु शकतात अर्ज
जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
Govt Bank Vacancy: बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये शिपाई (Office Assistant/ Peon) च्या जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 निश्चित केली गेली आहे. जे दहावी पास विद्यार्थी सरकारी नोकरीच्या शोधात असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ बडोदाच्या ऑफिस असिस्टेंट/ शिपाईच्या पादासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराने फक्त 10 वी उत्तीर्ण (S.S.C./ Matriculation) असणं आवश्यक आहे. याव्यरिक्त, विद्यार्थ्याला राज्य किंवा तिथल्या क्षेत्रानुसार स्थानिक भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराचं वय किमान 18 वर्षे आणि कमाल 26 वर्षे असायला हवे. राखीव प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारांना नियमांनुसार उच्च वयात सूट दिली जाईल. वयोमर्यादा 1 मे 2025 तारीख लक्षात घेऊन मोजली जाईल.
हे ही वाचा: Personal Finance: तुमचे पैसे डबल करण्यासाठी 'या' आहेत भन्नाट स्कीम
अर्ज करण्यासाठी शुल्क
या भरतीमध्ये अर्जासोबत, जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये फी जमा करावी लागेल. याशिवाय, सर्व प्रवर्गातील अनुसूचित जाती, जमाती, पीएच (अपंग) आणि महिला उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्जासाठीचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.










