Jalgaon : CM शिंदेंविरोधात बातमी छापली, पत्रकारावर जीवघेणा हल्ला; पहा Video
धुळ्यातील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गाडी अडवून हल्ला करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बातमी छापली म्हणून आमदार किशोर पाटील यांनी धमकी दिली होती. त्यानंतर हा हल्ला झाला आहे.
ADVERTISEMENT
– मनीष जोग, जळगाव
ADVERTISEMENT
Attack on Journalist in Jalgaon : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध बातमी छापली म्हणून जळगावात पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जळगावमध्ये हल्ला करण्यात आला. गाडीवरून खाली पाडून त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी धमकी दिल्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Shiv Sena MLA Kishore Patil’s activists attacked journalist Sandeep Mahajan)
भडगाव तालुक्यातील गोंडगावमध्ये एका 7 चिमुकलीवर बलात्कार झाला. या घटनेनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी ‘मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी’ मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केले होते. या बातमीनंतर पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील कॉल करून शिवीगाळ केली. तसेच धमकी दिली. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
हे वाचलं का?
पत्रकाराला रस्त्यात अडवलं अन्…
9 ऑगस्टला पत्रकार संदीप महाजन हे गाडीवरून जात होते. त्यावेळी त्यांना काही जणांनी अडवले. त्यांना दुचाकीवरून खाली पाडले आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. व्हिडीओमध्ये ही सगळी घटना कैद झालीये. मारहाणीनंतर महाजन यांनी आमदार किशोर पाटलांवर आरोप करून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केलीये.
पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची का? रोहित पवार संतापले
पत्रकाराला करण्यात आलेल्या मारहाणीवरून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. घटनेचा व्हिडीओ ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….”
ADVERTISEMENT
वाचा >> ‘…आणि नरेंद्र मोदींना मारून टाकेन’, पुण्यातील तरुणाची धमकी, पोस्टमध्ये काय?
“विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे.ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल”, असे रोहित पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
वाचा >> Raj surve : ‘तुम्हारा बाप बोल रहा हूँ’, आमदार सुर्वेंच्या कार्यालयात CEO सोबत काय घडलं?
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले… pic.twitter.com/cjMxWbT1y3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2023
“आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना , स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का ? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो,सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे,परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे”, अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT