Kalyan Accident : भीमाशंकरला जाताना काळाची झडप! शिवसेना नेत्याचा भाचा आणि मामेभाऊ ठार
Kalyan News Marathi : कल्याणवरून भीमाशंकरला जात असलेल्या तरुणांच्या कारचा अपघात झाला. यात शिवसेना नेत्याच्या दोन नातेवाईकांसह तिघांचा जागीच मृत्यु झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भीमाशंकरला जाताना कारचा अपघात
माळशेज घाटातील झाडावर धडकली कार
अपघातात तीन भाविकांचा मृत्यू, तीन गंभीर
Kalyan News : श्रावण सोमवारच्या निमित्ताने भीमाशंकरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारवर काळाने रस्त्यातच झडप घातली. माळशेज घाट पार करत असताना कार झाडावर जाऊन आदळली, यात कल्याणमधील तीन तरुण जागीच ठार झाले. तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यु झालेले तिघांपैकी दोघे शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांचे जवळचे नातेवाईक आहेत. यात गायकवाड यांचा एक सख्खा भाचा, तर एक मामेभाऊ आहे. (Three youth died in car accident)
कल्याणहून कारने भीमाशंकरला जात असताना ही घटना घडली. माळशेज घाटातील भोरांडे गावाच्या हद्दीतून जाताना भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली.
मृत्यू झालेल्यांची नावे काय?
आश्विन भोईर (वय ३१), नरेश मधुकर म्हात्रे (वय ३३) आणि प्रतीक चोरगे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
हेही वाचा >> सचिन वाझेंच्या 'त्या' लेटरबॉम्बमध्ये जयंत पाटलांचं नाव कसं आलं?
वैभव मधुकर म्हात्रे (वय २५), शिवाजी पुडंलिक घाडगे ऊर्फ बंटी, अक्षय घाडगे अशी गंभीर जखमींची नावे आहेत.










