Sachin Waze : सचिन वाझेंच्या 'त्या' लेटरबॉम्बमध्ये जयंत पाटलांचं नाव कसं आलं?

विद्या

ADVERTISEMENT

sachin waze big allegation on anil deshmukh jayant patil sharad pawar sent letter to devendra fadnavis maharashtra politics
सचिन वाझेने फडणवीसांना लिहिलेले पत्र आले समोर...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जयंत पाटील यांनी अवैध काम करून घेतले.

point

जयंत पाटलांनी आरोपींना सोडण्यासाठी दबाव टाकला

point

चांदीवाल समितीसमोर जबाब देताना माझ्यावर दबाव टाकला

Sachin waze Letter : राज्याचे आजी माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात शाब्दीक आरोपाचा वाद रंगला होता. या वादाचा आता दुसरा अंक सुरु झाल्याची चर्चा आहे. कारण आता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin waze) यांनी आरोपांचा एक लेटरबॉम्ब फोडला आहे. या लेटरबॉम्बमध्ये त्यांनी 'माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) स्वीय सहायकामार्फत पैसे घेतल्याचा आरोप केला होता'. हा लेटरबॉम्ब त्याने देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पाठवल्याचा दावा केला होता. आता हा लेटरबॉम्ब समोर आला आहे.  (sachin waze big allegation on anil deshmukh jayant patil sharad pawar sent letter to devendra fadnavis maharashtra politics)

सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख गृहमंत्री असताना जयंत पाटील यांनी अवैध काम करून घेतले. एवढचं नाही तर चांदीवाल समितीत मी जबाब देत असताना माझ्यावर अनिल देशमुख दबाव आणत होते, असा दावा त्यांनी केला आहे. 

हे ही वाचा : Raj Thackeray: हॉटेलमध्ये राडा, मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलं... काय घडलं?

मी पोलीस दलातील गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदी असताना अवैध हुक्का पार्लर आणि भारतातील सर्वात मोठ्या वितरकास अटक केली होती. अटक केल्यानंतर जयंत पाटील यांच्या शासकीय बंगल्यावरून आरोपींना सोडण्याबाबत आणि त्या बदल्यात दुसऱ्याला अटक करण्याबाबत फोन आल्याचा दावा वाझेने केला आहे . वाझेने या आरोपाची रेकॉर्डिंगही असल्याचा दावा केला असून सीडीआरद्वारे माहिती समोर येईल, असे त्याने म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तसेच न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला होता. या चांदीवाल समितीसमोर जबाब देत असताना माझ्यावर अनिल देशमुख दबाव आणत होते असा आरोप वाझेने केला आहे.

इतकंच नाही तर सचिन वाझेने नवीन मोठा खुलासा केला आहे. ठाणे पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांना लिहिलेले पत्र सचिन वाझेच्या पत्रासोबत जोडलेले दुसरे पत्र समोर आले आहे. पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांच्या बदली करता 25 लाख रुपये घेतले होते. सुखदा या निवासस्थानी 25 लाख रुपये घेतले होते. पैसे परत न केल्यास आमरण उपोषण करण्याचे पत्र विजय देशमुख यांनी दिले होते. तसेच पत्रात पुन्हा एकदा शरद पवार, अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांचा उल्लेख केला आहे. अनिल देशमुख यांच्या दबावाखाली येऊन अनेक अवैध कामे करावी लागल्याचा दावा देखील वाझेने केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Prakash Ambedkar : 'मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस', आंबेडकरांची बोचरी टीका

सचिन वाझे यांच्या या लेटरबॉम्बनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या आरोपावर आता जयंत पाटील काय प्रतिक्रिया देतात?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT