कोकणात सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बस 20 फुट खाली कोसळली, बसचा अक्षरश: चुराडा; चौघांची प्रकृती गंभीर
Karad Accident : कोकणात सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बस 20 फुट खाली कोसळली, बसचा चुराडा; कराडमध्ये दुर्दैवी घटना
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोकणात सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बस 20 फुट खाली कोसळली
बसचा अक्षरश: चुराडा; कराडमध्ये दुर्दैवी घटना
कराड : नाशिकहून कोकणातील सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची खासगी बस नाशिककडे परतत असताना कराड तालुक्यात पहाटे भीषण अपघात झाला. वाठार गावाजवळ झालेल्या या दुर्घटनेत बस जवळपास 20 फुट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात 30 ते 32 विद्यार्थ्यांना दुखापत झाली असून त्यापैकी चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी बसचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मात्र, या अपघातात 30 ते 32 विद्यार्थी जखमी झाले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव (जि. नाशिक) येथील विद्यार्थ्यांची सहल कोकणात निघाली होती. सहल संपल्यानंतर बस रात्री उशिरा नाशिककडे प्रयाणासाठी निघाली. पहाटेच्या सुमारास बस वाठार परिसरात पोहोचली असता चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकला. महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे रस्त्याच्या कडेला मोठी खोल दरीसारखी जागा निर्माण झाली होती. चालकाला ती जागा दिसली नाही आणि बस थेट त्या दिशेला घसरत दरीत कोसळली.
हेही वाचा : मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत घबाड सापडलं, निलेश राणेंनी थेट पोलीस स्टेशन गाठलं
अचानक झालेल्या धडकेने बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. बस कोसळल्यानंतर क्षणभर विद्यार्थ्यांना काय घडले ते समजायलाच वेळ लागला. सुदैवाने बस उलटली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र धक्क्याची तीव्रता इतकी होती की बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झालाय.










