भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावादरम्यान आणखी एक खलिस्तानी दहशतवादी ठार!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

khalistani terrorist sukha dunuke killed between india and canada dispute
khalistani terrorist sukha dunuke killed between india and canada dispute
social share
google news

India-Canada Dispute : कॅनडामध्ये सुखविंदर सिंग उर्फ ​​सुखा दुनुके या गुंडाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 20 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. एक-दोन नव्हे तर, तब्बल 9 गोळ्या. हत्या झाली तेव्हा कॅनडात सकाळचे साडेनऊ वाजले होते. (Khalistani terrorist Sukha Dunuke killed between India and Canada Dispute)

ADVERTISEMENT

सुखा 2017 मध्ये बनावट पासपोर्ट बनवून पंजाबमधून कॅनडाला पळून गेला होता. त्याच्यावर पंजाबमध्ये 18 गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली होती, तर बहुतांश प्रकरणांमध्ये तपास सुरू होता. हत्येच्या वेळी सुखा कॅनडातील विनिपेग शहरातील हेझल्टन ड्राईव्ह रोडवरील कॉर्नर हाऊसच्या फ्लॅट क्रमांक 203 मध्ये राहत होता. हे त्याचं घर होतं. हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून त्याची हत्या केली.

Bhiwandi Murder : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा कटरने गळा चिरला, अन् आरोपीनं थेट…

माहितीनुसार, सुखा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ ​​अर्श डल्लाचा उजवा हात मानला जात होता. तर, हा अर्श डल्ला जूनमध्ये हत्या झालेल्या हरदीप निज्जरचा मित्र आहे. सुखाचा एनआयएच्या वाँटेड यादीत समावेश होता. सुखावर आरोप होता की, तो कॅनडामधून भारतातल्या त्याच्या गुडांमार्फत पैसे उकळण्याची कामही करत होता. तो शस्त्रास्त्रांची तस्करीही करायचा.

हे वाचलं का?

त्याची हत्या झाली तेव्हा खुनाला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा आरोप असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगने ही जबाबदारी घेतली. या गँगच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात आली होती. ज्यामध्ये गुरलाल ब्रार, विक्की मिड्दुखेडा आणि संदीप नंगल अंबिया यांच्या हत्येत सुखाचा हात असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळेच हा बदला घेण्यात आला. त्यात असे म्हटले होते की, “तो ड्रग्सचा व्यसनी होता आणि त्याने केवळ त्याचे व्यसन भागवण्यासाठी पैशासाठी अनेक घरं उद्ध्वस्त केली होती. पण आता त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली आहे.”

मात्र या हत्येपूर्वीच भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणातील नवीन अपडेट म्हणजे व्हिसा सेवा बंद करणे. भारताने अधिकृतपणे कॅनेडियन लोकांना व्हिसा सेवा देणं बंद केलं आहे. तसंच, ही बंदी तात्पुरती आहे आणि भारत सरकार कधीतरी परिस्थितीचा आढावा घेईल. ट्वीटर पोस्टवरून बंदीची माहिती मिळाली.

ADVERTISEMENT

BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस या कॅनडामध्ये व्हिसा सेवा देणाऱ्या कंपनीने ट्वीटरवर मेसेज पोस्ट केला. त्यानुसार, ऑपरेशनल कारणांमुळे, भारतीय व्हिसा सेवा 21 सप्टेंबर 2023 पासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांना भारतीय मिशनकडून ही नोटीस मिळाली आहे. याचा अर्थ कॅनडातील एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भारतात यायचं असेल तर त्याला व्हिसा मिळू शकणार नाही.

ADVERTISEMENT

वर्ल्ड कप संघाची झाली घोषणा, धवनसह ‘या’ खेळाडूंचेही भंगले स्वप्न

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी 21 सप्टेंबर रोजी पत्रकारांशी बोलताना परिस्थिती स्पष्ट केली. सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाने असेही स्पष्ट केले की, कॅनडाच्या वंशाच्या व्यक्तीला दुसऱ्या देशाचा व्हिसा घेऊन भारतात यायचे असले तरी ते शक्य होणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारच्या उणिवांवरही प्रश्न उपस्थित केले की, सरकार सुरक्षा पुरवण्यास सक्षम नाही, धमक्या मिळत आहेत, त्यामुळे व्हिसा सेवा काही काळासाठी बंद करण्यात येत आहे.

जेव्हा कोरोना पसरला तेव्हा महामारी रोखण्यासाठी व्हिसावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. परंतु, भारताने याआधी कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही देशाचा व्हिसा रद्द केलेला नाही आहे. पाकिस्तानातूनही नाही.

बागची यांच्या वक्तव्यानुसार, भारत सरकारने कॅनडा सरकारला त्यांच्या देशात होत असलेल्या दहशतवादी कारवायांची माहिती दिली होती. मात्र कॅनडा सरकारने हरदीप निज्जरबाबत कोणतीही माहिती दिली नाही. ना निज्जरच्या हत्येनंतर कोणतीही माहिती दिली. यासोबतच परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, सरकार भारतीय सीमेवर उपस्थित असलेल्या कॅनडाच्या डिप्लोमॅटची संख्या कमी करण्याचा विचार करत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या नुकत्याच केलेल्या विधानांची यादी..

  • कॅनेडियन वंशाच्या व्यक्तींसाठी व्हिसा सेवा बंद केली जात आहे.
  • भारतात उपस्थित असलेल्या कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या कमी होईल
  • कॅनडाच्या सरकारने हरदीप निज्जरबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
  • कॅनडाच्या सरकारने आपल्या देशात वाढणारा दहशतवाद रोखण्यासाठी काहीही केले नाही.
  • कॅनडात वाढणाऱ्या दहशतवादाला पाकिस्तानकडून आर्थिक मदत केली जात आहे.

निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर कॅनडाने भारतीय राजनयिकाला देश सोडण्याचे आदेश दिले होते. भारतानेही हीच कारवाई केली. कॅनडाच्या इंडिया डेस्कचे इंटेलिजन्स चीफ आणि दूतावासातील अनेक कर्मचाऱ्यांना येथून हाकलण्यात आले.

याशिवाय भारताची राष्ट्रीय तपास संस्था NIA देखील सक्रिय आहे. खलिस्तान समर्थक आणि त्यांच्याकडून होत असलेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना एनआयएने 20 आणि 21 सप्टेंबर रोजी अनेक नावे जाहीर केली आहेत. यापैकी काही नावे तुम्हाला आधीच माहीत आहेत, काही नावे नवीन असू शकतात.

पहिली गोष्ट 20 सप्टेंबरची आहे. या दिवशी एनआयएने 43 कुख्यात गुन्हेगारांचे फोटो जारी केले. यासोबतच या गुंडांच्या मालमत्ता आणि व्यवसायासह कोणाकडे काही तपशील असतील तर त्यांनी ते एनआयएला द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यातील काही प्रमुख नावं आहेत जी भारत आणि कॅनडात घडणाऱ्या हिंसक घटनांमध्ये वारंवार घेतली जात आहेत.

लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई (जो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे), गोल्डी ब्रार,अर्शदीप गिल, जसदीप सिंग उर्फ ​​जग्गू भगवानपुरिया, लखबीर सिंग उर्फ ​​लंडा

या यादीत पंजाब-हरियाणा-राजस्थान भागात झालेल्या गँगवॉरमध्ये मोठ्या संख्येने लोकांची नावे आहेत. ही नावे आणि त्यांचे गुन्हे कॅनडापर्यंत विस्तारले आहेत.

आमदार अपात्रतेबाबतच्या हालचालींना वेग, राहुल नार्वेकरांनी दिले मोठे संकेत

यानंतर 21 सप्टेंबर या दिवशी एनआयएने अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या काही खलिस्तान समर्थकांचे फोटो जारी केले. एनआयएने लोकांना विचारले आहे की, जर तुम्हाला त्यांची ओळख, नाव आणि पत्ता माहित असेल तर कृपया आम्हाला देखील सांगा. मार्च 2023 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात खलिस्तान समर्थकांनी प्रवेश करत तोडफोड केल्याचा आरोप आहे. येथे खलिस्तानचा झेंडाही लावला होता आणि भिंतींवर ‘से फ्री अमृतपाल’ असं लिहिलं होतं.

आता इथे दोन प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न असा आहे की, भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या तणावाचा पुढचा अध्याय काय असू शकतो? आणि दुसरा प्रश्न असा आहे की कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि भारतीय वंशाच्या लोकांकडे कोणते पर्याय आहेत? कारण परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेनंतर सर्वाधिक भारतीय विद्यार्थी कॅनडात राहतात.

आकडेवारीनुसार ही संख्या 1 लाख 86 हजार एवढी आहे. अशा वेळी तिथे उपस्थित असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत का? कारण परराष्ट्र मंत्रालयाने कॅनेडियन लोकांना नवीन व्हिसा देणं बंद केलं आहे. काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी बोललो आणि या विद्यार्थ्यांपैकी सर्वात मोठा भाग पंजाबचा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘माझ्या आजोबांची हत्या करणाऱ्या व्यक्तीचा निज्जर हा राइट हँड होता असंही रवनीत सिंह बिट्टू म्हणाले .’

याशिवाय, भारतातून मोठी लोकसंख्या कॅनडामध्ये येत असते हेही वास्तव आहे. या लोकसंख्येचे म्हणणे आहे की व्हिसा संकटाचे रूपांतर दोन देशांमध्ये दरीसारखं झालं आहे. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होईल. तणावाच्या अभावाबरोबरच कोणताही देश भारतातील गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनू नये, दहशतवाद्यांमुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडू नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. निरपराध सुरक्षित रहावे आणि दोषींना योग्य न्याय मिळावा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT