खारघर दुर्घटना: महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी अद्यापही मीडियासमोर आपली बाजू का नाही मांडली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

kharghar tragedy why maharashtra bhushan appasaheb dharmadhikari still hasnt presented his side in front of media
kharghar tragedy why maharashtra bhushan appasaheb dharmadhikari still hasnt presented his side in front of media
social share
google news

मुंबई: नवी मुंबईतील खारघरमध्ये 16 एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award Event) सोहळ्यादरम्यान, तब्बल 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर आता हळूहळू या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. सुरुवातीला हे मृत्यू उष्माघाताने झाल्याचं बोललं गेलं. मात्र, आता विरोधकांनी असा आरोप केला आहे की, चेंगराचेंगरीमुळे ही दुर्घटना घडली आहे. याबाबत आता उच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील केली जात आहे. एकीकडे सरकारकडून याबाबत फारसं स्पष्टीकरण देत असल्याने आता विरोधक हे आक्रमक झाले आहेत. पण या सगळ्यामध्ये श्री सदस्यांना कुटुंबीय म्हणून संबोधणारे आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) हे अद्यापही मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (kharghar tragedy why maharashtra bhushan appasaheb dharmadhikari still hasnt presented his side in front of media)

ADVERTISEMENT

आप्पासाहेब धर्माधिकारी मीडियासमोर येऊन आपली बाजू का मांडत नाही?

ज्या आप्पासाहेबांना पाहण्यासाठी त्यांचे लाखो श्री सदस्य हे खारघरच्या मैदानावर जमा झाले होते तेच आप्पासाहेब धर्माधिकारी एवढ्या मोठ्या दुर्घटनेबाबत मीडियासमोर येऊन आपली नेमकी बाजू का मांडत नाही असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा देखील आप्पासाहेब धर्माधिकारी किंव त्यांच्या प्रतिष्ठानाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. दुर्घटनेच्या 24 तासानंतर केवळ एक पत्रक काढून या घटनेबाबत आप्पासाहेबांनी शोक व्यक्त केला आणि या दुर्घटनेचं कोणीही राजकारण करू नये असं यावेळी सांगण्यात आलं.

हे वाचलं का?

दरम्यान, भर दुपारी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमावरून सध्या बरीच टीका सुरु आहे. शिंदे सरकारचे मंत्री उदय सामंत यांनी तर असं म्हटलं होतं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यावा असं सुचवलं होतं. त्याबाबत आप्पासाहेब धर्माधिकारींना याविषयी कळविण्यात देखील आलं होतं. मात्र श्रीसदस्यांच्या मागणीनुसार हा कार्यक्रम दुपारी घेण्यात आला.

हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?

अशावेळी आता सरकार आपली जबाबदारी झटकून ती आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर टाकत असल्याचं विरोधक बोलत आहेत. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर नेमकं स्पष्टीकरण होणं आवश्यक आहे. त्यासाठी स्वत: आप्पासाहेबांनी मीडियासमोर येऊन पत्रकारांच्या उत्तरं देणं आवश्यक आहे. मात्र, अद्याप तरी त्यांच्या बाजूने मीडियाला काहीही कळविण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबई Tak ने केला आप्पासाहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न

या संपूर्ण घटनेनंतर आप्पासाहेबांची काय बाजू आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे याविषयी जाणून घेण्यासाठी मुंबई Tak ने अनेकदा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

ADVERTISEMENT

आप्पासाहेबांनी मृत श्री सदस्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली का?

या घटनेनंतर आता आप्पासाहेबांबाबत देखील अनेक जण सवाल उपस्थित करत आहेत. दुर्घटनेनंतर आप्पासाहेब हे जर श्री सदस्यांना कुटुंबीय मानत असतील तर अशावेळी दुर्घटनेनंतर आप्पासाहेबांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार सुरु असलेल्या श्री सदस्यांची भेट का घेतली नाही?, जे श्री सदस्य मृत पावले त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न का केला नाही?, मृतांच्या कुटुंबीयांना आप्पासाहेब किंवा त्यांच्या प्रतिष्ठानने कोणती आर्थिक मदत जाहीर केली का? असे अनेक सवाल आता विचारले जात आहेत.

हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?

मात्र हे सगळे सवाल अद्यापही अनुत्तरीतच आहेत. कारण आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी याबाबत सार्वजनिकपणे काहीही भाष्य केलेलं नाही.

आप्पासाहेब म्हणतात, ‘सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य…’

दुर्घटनेनंतर आप्पासाहेबांच्या वतीने एक पत्रक काढण्यात आलं होतं. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की, ‘महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देश-विदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे त्यानुसार आम्ही सारे जण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. अशी आमची अपेक्षा आहे.’ असं आप्पासाहेबांकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं होतं.

खारघरमध्ये नेमकी काय घटना घडलेली?

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सोहळ्यात उपस्थित असलेल्या 11 श्रीसदस्यांचा रणरणत्या उन्हात उष्माघाताने मृत्यू झाला होता. तर 24 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय 25 जणांना प्राथमिक उपचार करुन घरी पाठविण्यात आल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

हे ही वाचा>> जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला चेंगराचेंगरीचा व्हिडीओ, म्हणाले…

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मृत कुटुंबीयांना सरकारच्यावतीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तसेच सर्व उपचार घेणाऱ्या श्रीसदस्यांचा मोफत इलाज करण्याच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जखमींपैकी काही जणांवर खारघर सेंट्रल पार्कजवळील टाटा हॉस्पिटल, कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल, वाशी येथील महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

रविवारी नवी मुंबईजवळील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 25 लाख श्रीसदस्यांनी उपस्थिती लावली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT