सविता भाभी...नाम तो सुना होगा! 'या' बाईच्या नादाला लागून 20 महिलांची झाली फसवणूक, घडलं तरी काय?
Savita Bhabhi Viral News : बंगळुरुचं झगमगतं जग..जिथे अनेक श्रीमंत महिला किटी पार्टीत एन्जॉय करतात. पण याच किटी पार्ट्यांच्या माध्यमातून एक महिला मोठं कांड करते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सविताने केलं मोठं कांड..

त्या महिलांची कशी झाली फसवणूक?

असा झाला सविताचा पर्दाफाश
Savita Bhabhi Viral News : बंगळुरुचं झगमगतं जग..जिथे अनेक श्रीमंत महिला किटी पार्टीत एन्जॉय करतात. पण याच किटी पार्ट्यांच्या माध्यमातून एक महिला मोठं कांड करते. मैत्रीचा हात पुढे करून या महिलेनं श्रीमंत महिलांना तिंच शिकार बनवलं. तिच्यासाठी या फक्त किटी पार्ट्या नव्हत्या..तर फसवणूकीचं मोठं हत्यार होतं. या माध्यमातून भामट्या महिलेनं 20 पेक्षाही अधिक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ही महिला सोनं स्वस्तात खरेदी करुन द्यायचं आमिष इतर महिलांना दाखवायची. नंतर या महिलेनं असं काही केलं, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
सविताने केलं मोठं कांड..
या महिलेचं नाव आहे सविता..ही महिला किटी पार्ट्यांच्या माध्यमातून श्रीमंत महिलांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालायची, असा आरोप केला जात आहे. सविताला याआधीही फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली होती. आता यावेळी ती जामीनावर बाहेर होती. पोलिसांनी सवितासह तिच्या सहा सहकाऱ्यांनाही अटक केलं आहे. यामध्ये तिच्या मुलीचाही सहभाग आहे. कोण आहे ही सविता आणि श्रीमंत महिलांची कशी फसवणूक करायची? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: मुंबईत मिळणार स्वस्तात घर! 'MHADA' मध्ये निघाली मोठी लॉटरी, बघा तुमचा नंबर लागतोय का..
कुसुमा नावाची एक महिला टीचर..मागील 30 वर्षांपासून 'सविता' अशी तिची ओळख..एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, वर्ष 2020 पासून सविता आणि तिच्या मैत्रिणीने पैशांची देवाण घेवाण सुरु केली होती. पण 2023 मध्ये खरा खेळ सुरु झाला. एक दिवस सविताने कुसुमाला फोन केलं आणि सांगितलं की, दुबईत सोनं खूप स्वस्त मिळतं. सविताने म्हटलं की, तिचा पती तिथे नोकरी करतो. त्यामुळे तिने कुसुमाला सोन्यात दोन वर्षांसाठी गुंतवणूक केली तर, चार पट नफा मिळेल, असं आमिष दाखवलं.
त्या महिलांची कशी झाली फसवणूक?
त्यानंतर कुसुमाने 24 लाख रुपये सविताला दिले. काही पैसे सविताच्या भावाला, काही पैसे तिच्या आईला आणि काही पैसे मुलगी वाल्मिकाला दिले. त्यानंतर कुसुमाचं ट्रान्सफर झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुमा पैशांच्या प्रत्येक ट्रान्सफरबाबत सविताला फोनवर सांगायची.
हे ही वाचा >> "दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न..." नाराज वडिलांनीच राधिकाची केली हत्या; नवीन अपडेट आली समोर!
सविताचा आणखी एक प्लॅन..
6 जानेवारी 2024 रोजी सविताने पुन्हा कुसुमाला फोन केलं आणि म्हटलं, मी उदय टीव्ही प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आहे आणि तुझे पैसे डबल केले आहेत. आता आणखी दहा लाख रूपये लाव. तुला पुन्हा मोठं रिटर्न मिळेल. कुसुमची फसवणूक झाली होती. तिने आणखी दहा लाख रोख रक्कम दिली. कुसुमाने जवळपास 95 लाख रुपये दिले.
असा झाला सविताचा पर्दाफाश
जून 2025 मध्ये जेव्हा कुसुमा तिचे पैसे परत मागण्यासाठी सविताच्या घरी गेली. तेव्हा तिचा अपमान करून तिला घरी पाठवण्यात आलं. सविताने म्हटलं की, तिने खूप लोकांकडून उधार पैसे घेतले. पण कोणालाही ती पैसै परत देत नव्हती. दरम्यान, 8 जुलैला कुसुमाने सविताहस सात लोकांना म्हणजेच पुनीत, सतीश, वाल्मिका, दर्शन, लोकेश आणि श्रीधरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.