Viral News : मालकाने शिड्याच तोडल्या भाडेकरूला दोराला बांधून खाली उतरवलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

landlord break staircase to first floor as tenant could not pay rent kancheepuram tamilnadu story
वेणुगोपाल यांना लकवा आला होता. त्यामुळे त्यांना चालता-फिरता येत नव्हते.
social share
google news

Viral News Story : देशातील विविध भागात स्थलांतर होणारी लोकं भाड्यावर राहतात. स्वत:च्या राहण्याचं  मालकीचे ठिकाण नसल्या कारणाने या लोकांना भाड्यावर राहावे लागते. पण या घटनेत एका भाड्यावर राहणाऱ्या व्यक्तीसोबत धक्कादायक घटनाा घडली आहे. या घटनेतील पिडीत भाडोत्रीने (Tenant) रुम मालकाचे (Room Owner) भाडे थकवले होते. या घटनेने रागावलेल्या रूम मालकाने पहिल्या मजल्यापर्यंत असलेल्या पायऱ्याच तोडल्याची घटना घडली आहे. या घटनेची चर्चा आता सर्वंत्र रंगली आहे.  (landlord break staircase to first floor as tenant could not pay rent kancheepuram tamilnadu story) 

ADVERTISEMENT

इंडिया टूडे दिलेल्या वृत्तानुसार,  तामिळनाडूच्या कांचिपूरममध्ये ही घटना घडली आहे. वनविल नगरमधील श्रीनिवास नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वेणुगोपाल भाड्यावर राहायचे. वेणुगोपाल यांना लकवा आला होता. त्यामुळे त्यांना चालता-फिरता येत नव्हते. काही महिन्यापासून त्यांना घराचे भाडेही देता येत नव्हते. या कारणामुळे रूम मालकाने त्यांना घर खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण अशा अवस्थेत घर खाली करण्याची परिस्थिती नसल्या कारणाने वेणुगोपाल यांनी एका वकीलाची मदत घेतली होती. 

हे ही वाचा : मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये पंकजा मुंडे, भुजबळ, शेंडगे, तायवाडेंची नावे

वकीलाच्या मदतीने वेणुगोपाल यांनी रूम खाली करण्यासाठी काहीसा कालावधी मागितला होता. याच गोष्टीवर रूम मालक नाराज झाला होता.याच नाराजीतून रूम मालकाने त्याच्या भाड्याच्या घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत जाणाऱ्या पायऱ्याच तोडल्या. यामुळे वेणुगोपाल हे घरातच अडकून पडले होते. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना लागताच त्यांनी तत्काळ आपत्कालीन सेवा विभागाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आपत्कालीन सेवा विभागाने घटनास्थळी पोहोचून वेणुगोपाल यांनी दोरीच्या सहाय्याने घरातून रेस्क्यु केले होते. त्यामुळे वेणुगोपाल यांच्या जीवात जीव आला होता. 

हे वाचलं का?

दरम्यान भाडे नियंत्रण कायद्यानुसार, घरमालक कोणत्याही विशिष्ट कारणाच्या आधारे भाडेकरूला बाहेर काढू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर, पूर्ण भाडे न देणे, घरात कोणतेही बेकायदेशीर काम करणे, भाडे कराराची कोणतीही अट मोडणे. घरमालकाला मालमत्तेची गरज असल्यास तो घर रिकामे करून घेऊ शकतो.पण यामागे कारण योग्य असणे गरजेचे आहे, असेही कायदा म्हणतो. तसेच, भाडेकरूला घर रिकामे करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. इतकंच नाही तर भाडेकरूला दुसरी जागा मिळत नाही तोपर्यंत त्याला विहित वेळेपूर्वी बाहेर काढता येत नाही, असाही नियम सांगतो. 

हे ही वाचा : Marashtra Election : अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT