Jalna Maratha Protestors: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा तुफान लाठीहल्ला, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jalana maratha akrosh morcha lathicharge
Jalana maratha akrosh morcha lathicharge
social share
google news

Jalna Maratha Protestors: जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या मराठा आक्रोश मोर्चाच्या उपोषणाला हिंसक वळण लागलं आहे. जालन्यात (Maratha) मराठा आरक्षणासलाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj jarange patil) यांचे आंदोलन चालू होते. हे आंदोलन चालू असतानाच जरांगे-पाटील यांची प्रकृती बिघडली. याचवेळी पोलिसांबरोबर चर्चा चालू असतानाच अचानक आंदोलनातील नागरिकांवर पोलिसांनी तुफान लाठीचार्ज चालू करताच जोरदार गोंधळ उडाला. या लाठीचार्जमध्ये अनेक पुरुष आणि महिला जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

आंदोलनाला हिंसक वळण

जालन्यातील अंतरावाली सराटी गावामध्ये शांततेते चालेल्या आंदोलनावर हिंसक वळण का लागले असा आता सवाल उपस्थित केला जात आहे. या लाठीचार्ज नंतर आता दोन बस पेटवल्याचीही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा >> Parliament special session: ‘सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीतच राहा…’ PM मोदी घेणार प्रचंड मोठा निर्णय?

लाठीचार्जमुळे वातावरण चिघळले

मराठा आक्रोश मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, चर्चेनंतरही पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळेच हे वातावरण चिघळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

पवारांकडून तीव्र निषेध

पोलिसांच्या लाठीचार्जवर राष्ट्रवादीचे शरद पवारा यांनी बोलताना सांगितले की , या घटनेची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारीच आहे. चर्चेनंतरी जर पोलिसांनी आंदोलकांवर जर बळाचा वापर करुन लाठीहल्ला केला असेल तर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आहे.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : ‘…आघाडीची भेंडी झाली’, फडणवीसांनी काढले विरोधकांचे वाभाडे

तिथे जाऊन धीर द्यावा लागेल

राज्य सरकारने हे प्रकरण थांबवले नाही तर मला तिथे जाऊन मला त्यांना धीर द्यावा लागेल असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले. गृहमंत्र्याची सूचना असल्याशिवाय लाठीचार्ज केला जाणार नाही अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली, काही घटकांची कृती ही पोलिसांच्या कृत्तीतून दिसून येते अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

शांततेने सगळं चाललं होतं

या आंदोलनावर शरद पवार यांनी बोलताना म्हणाले की, जालन्यावरुन एक-दोन लोकांचे फोन आले. तिथे काय घडलंय ते सांगितलं. तिथे मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी हे उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमयही  केला होता. त्या चर्चेमध्ये शांततेने सगळं चाललं होतं, पण चर्चा झाल्यानंतर पोलीस बळाचा वापर करून त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केला गेला असा आरोपही त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

गृहमंत्र्यांची सूचना असावी

शरद पवार म्हणाले की, त्यामध्ये त्या तरुणांवर प्रखर लाठीहल्ला केला. खरं तर म्हटलं एकदा तुम्ही चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काही आवश्यकता नव्हती. पण हल्ली विशेषत: अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्यासंबंधीचे कुठलेही प्रश्न असले आणि अशा प्रश्नांची उत्तंर नाही मिळाली तर ते रस्त्यावर आले तर बळाचा वापर यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांना का दोष द्यायचा

काही घटकांच्याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांचा मनात जी काही भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. ती कृती व्यक्त झाल्याचं चित्र आपण जालन्यात सुद्धा आज पाहिलं. त्यामध्ये पोलिसांना काय दोष द्यायचा? पोलिसांना वरनं जसे आदेश दिले तशी त्यांनी कामगिरी केली. पोलीस आणि तरुण यांच्यात कारण नसताना एक प्रकारची कटुता वाढली.

प्रशासनाची जबाबदारी

याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारला, राज्य सरकारमध्ये गृह खात्याची जबाबदारी घेणाऱ्या प्रशासकाची आहे. त्यामुळे हे घडतंय.. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय. जर हे तुम्ही थांबवलं नाही तर मला त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना धीर द्यावा लागेल. तसेच त्या लोकांची सुटका करण्यासाठी पावलं टाकावी लागतील. मला स्थानिक लोकांनी फोनवर सांगितलं की, फौजफाटा आला आणि त्यांनी आमच्याशी चर्चा केली.. त्यानंतर हा हल्ला केला. हा अमानुष हल्ला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT