Maharashtra: राज्यात ‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, पाहा तुमचा तालुका आहे का!
राज्य सरकाकडून राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही सवलती मिळणार असल्यातरी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांनी राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

Drought Declared : राज्यातील तालुक्यांमध्ये यंदा पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक तोट्यात सापडला आहे. त्यामुळे शेतीचा आणि परिस्थितीचा विचार करुन राज्य शासनाकडून (State Govt) 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ (moderate drought) जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता 40 तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सवलती लागू करण्यात आले आहेत. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर 40 तालुक्यांमध्यें शेतकऱ्यांसाठी काही सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलामध्ये सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत असलेल्या कर्जाच्या वसूलीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच कृषी पंपाच्या चालू विजबिलामध्ये 33.5 टक्क्यांची सूट देत शालेय आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये सूट देणयात आली आहे.
निकषामध्ये काही प्रमाणात शिथिलता
त्याच बरोबर रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. तर ज्या ठिकाणी पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी टँकर्सची गरज आहे त्या ठिकाणी वापर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाबरोबरच टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये शेतीच्या पंपांची वीज खंडीत न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.